शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विमानतळावर १० दिवसांत ४९ हेलिकॉप्टर उतरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 22:06 IST

वर्ष २०१४ च्या निवडणुकीच्या तुलनेत यावर्षीच्या निवडणुकीत प्रचारासाठी सर्वच पक्षांच्या राजकीय नेत्यांचे हेलिकॉप्टर वापरण्याचे प्रमाणात वाढले असून, एका दिवसाचे भाडे दोन ते अडीच लाख रुपये असतानाही १० दिवसांत ४९ हेलिकॉप्टर उतरल्याची माहिती मिहान इंडिया लिमिटेडच्या अधिकाऱ्यांनी दिली. पहिल्या टप्प्यात विदर्भातील प्रचाराच्या रणधुमाळीमुळे सर्वच पक्षांचे नेते नागपुरात येत असल्यामुळे विमानतळावर वर्दळ वाढली आहे.

ठळक मुद्देनिवडणुकीसाठी वापर : जिल्हा व तालुक्यात सभा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वर्ष २०१४ च्या निवडणुकीच्या तुलनेत यावर्षीच्या निवडणुकीत प्रचारासाठी सर्वच पक्षांच्या राजकीय नेत्यांचे हेलिकॉप्टर वापरण्याचे प्रमाणात वाढले असून, एका दिवसाचे भाडे दोन ते अडीच लाख रुपये असतानाही १० दिवसांत ४९ हेलिकॉप्टर उतरल्याची माहिती मिहान इंडिया लिमिटेडच्या अधिकाऱ्यांनी दिली. पहिल्या टप्प्यात विदर्भातील प्रचाराच्या रणधुमाळीमुळे सर्वच पक्षांचे नेते नागपुरात येत असल्यामुळे विमानतळावर वर्दळ वाढली आहे.कमी वेळेत जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष हेलिकॉप्टरचा वापर करीत आहेत. विदर्भात पहिल्या टप्प्यात मतदान असल्यामुळे देशातील सर्वच राजकीय नेत्यांचा प्रचाराचा कल विदर्भात १० मतदार संघात वाढला आहे. नेते हेलिकॉप्टरने दौरे करीत आहेत. विदर्भात ९ एप्रिलपर्यंत प्रचार करण्याची मुभा असल्यामुळे आणखी नेते हेलिकॉप्टरचा उपयोग करण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज, अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर आणि खासदार असउद्दीन ओवेसी यांनीही विदर्भात दौरे केले. या सर्व नेत्यांनी विमानतळावरून हेलिकॉप्टरने भंडारा, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ जिल्ह्यातील अनेक तालुक्यात प्रचार सभा घेतल्या.विदर्भात नागपूरसह चंद्रपूर, गोंदिया, अकोला आणि अमरावती येथे विमानतळ आहेत. पण मोठे नेते विमानाने नागपुरात येतात आणि हेलिकॉप्टरने वेगवेगळ्या ठिकाणी जातात. भाजप, काँग्रेससह वंचित बहुजन आघाडीने हेलिकॉप्टर खासगी कंपनीकडून भाड्याने घेतले आहे. २८ मार्चला चार, २९ मार्चला एक, ३० मार्चला पाच, ३१ मार्चला नऊ, १ एप्रिल १२, ३ एप्रिलला सात हेलिकॉप्टर विमानतळावर आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnagpur-pcनागपूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019