शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
2
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
3
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
4
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
5
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
8
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
9
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
10
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
11
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
12
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
13
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
14
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
15
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
16
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
17
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
18
डॉक्टरांची खुनाच्या गुन्ह्यांतून झाली सुटका; कोर्ट म्हणे, स्वसंरक्षण हा मूलभूत अधिकार
19
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
20
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा

नागपुरात अरुंद मार्गावर धावणार ४५ मिनी बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 23:18 IST

अरुंद रस्ते व दाट लोकवस्ती असलेल्या भागात बस वाहतूक शक्य होत नाही. स्टॅण्डर्ड व मिडी बसेस अशा भागात चालविणे शक्य होत नाही. यामुळे नागरिकांना सार्वजनिक परिवहन सेवेपासून वंचित राहावे लागत होते. याचा विचार करता महापालिकेचा परिवहन विभाग व तीन डिझेल बस ऑपरेटर यांच्यात झालेल्या करारानुसार शहरात ४५ मिनी बसेस चालविण्याला आचारसंहितेपूर्वी मंजुरी देण्यात आली. सोमवारी यासंदर्भात तीन बस ऑपरेटरला याची माहिती देण्यात आली.

ठळक मुद्देआचारसंहितेपूर्वी मंजुरी : बस ऑपरेटर बसेस खरेदी करणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: अरुंद रस्ते व दाट लोकवस्ती असलेल्या भागात बस वाहतूक शक्य होत नाही. स्टॅण्डर्ड व मिडी बसेस अशा भागात चालविणे शक्य होत नाही. यामुळे नागरिकांना सार्वजनिक परिवहन सेवेपासून वंचित राहावे लागत होते. याचा विचार करता महापालिकेचा परिवहन विभाग व तीन डिझेल बस ऑपरेटर यांच्यात झालेल्या करारानुसार शहरात ४५ मिनी बसेस चालविण्याला आचारसंहितेपूर्वी मंजुरी देण्यात आली. सोमवारी यासंदर्भात तीन बस ऑपरेटरला याची माहिती देण्यात आली.करारानुसार तीन ऑपरेटरला प्रत्येकी १५ बसेस खरेदी करून चालवावयाच्या आहेत. परिवहन विभागाने यासाठी १८ मार्ग निश्चित केले आहेत. या मार्गावरून दररोज ७४७ बसफेऱ्या होतील. शहरातील विविध भागात दररोज ८,५८१ किलोमीटर अंतर या बसेस धावतील.सूत्रांच्या माहितीनुसार, जुन्या झालेल्या ४५ स्टॅण्डर्ड बसेस मिनी बसमध्ये परिवर्तित क रण्यात येतील. महापालिकेला स्टॅण्डर्ड बसच्या संचालनावर प्रति किलोमीटर ५२ रुपये खर्च करावे लागतात तर मिनी बसच्या संचालनावर प्रति किलोमीटर ३७ रुपये खर्च येणार आहे. या बसेस दाट लोकवस्तीच्या भागात तसेच बाजार भागातून जातील. यामुळे प्रवाशांना सुविधा उपलब्ध होईल. परिवहन सभापती बंटी कुकडे यांनी यापूर्वीच मिनी बस संचालनाला हिरवी झेंडी दिली होती. मात्र परिवहन विभागाच्या लेटलतिफीमुळे याला विलंब झाला. या बसेसमुळे महापालिके च्या खर्चात बचत होण्याची आशा आहे. एका मिनी बसची किंमत २४ लाख असल्याचे सांगण्यात आले.करारातच ऑपरेटरांना ४५ मिनी बसेस चालविण्याची अट होती, परंतु काही तांत्रिक अडचणी होत्या. त्यामुळे याला विलंब झाल्याचे परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप यांनी सांगितले. बस संचालनाला आयुक्त अभिजित बांगर यांनी मंजुरी दिली आहे. यासाठी महापालिकेवर कोणत्याही प्रकारचा आर्थिक बोजा पडणार नाही.मेट्रोला मदत होणारमेट्रो रेल्वेसाठी मिनी बस फीडर बससेवेचे माध्यम ठरणार आहे. यासंदर्भात मेट्रोकडून प्रस्ताव आला होता. तेव्हा महापालिकेने ४५ मिनी बसेस चालविण्याचा निर्णय घेतला होता. मेट्रो रेल्वे काही भागात सुरू झाली आहे. मिनी बससेवेमुळे मेट्रोच्या प्रवासी संख्येत वाढ होण्याला मदत होणार आहे.काही प्रस्तावित मार्ग                                  बसफेऱ्याबर्डी ते यशोधरानगर व नागसेनवन                १२६बर्डी ते कामठी व्हाया शांतीनगर                   ११६बर्डी ते बेलतरोडी व्हाया रामेश्वरी, नरेंद्रनगर  ८२बर्डी ते वैशालीनगर                                     ६४बर्डी ते ओमनगर                                         ४२बर्डी ते न्यू मनीषनगर                                  ४०बर्डी ते चक्रपाणीनगर                                 ३०बर्डी ते मोमीनपुरा व्हाया कामठी                २४पिपळा फाटा ते गांधीबाग                            २३

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाBus Driverबसचालक