शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेचा ४५ कोटींचा निधी परत जाणार

By गणेश हुड | Updated: May 31, 2024 19:00 IST

Nagpur : शासनाच्या स्थगितीचा विकास कामांना फटका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य शासनाच्या वित्त विभागाने अखर्चित निधी ३१ मे पर्यंत शासन जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीमार्फत (डीपीसी) जिल्हा परिषदेला मिळालेला जवळपास ४५ कोटींचा  अखर्चित निधी परत जाणार आहे. वर्ष २०२१-२२ मधील हा निधी आहे. राज्यातील सत्तातरानंतर विकास कामांना स्थगिती देण्यात आली होती. परिणामी हा निधी अखर्चित राहीला आहे. 

राज्यात सत्तातरानंतर महायुतीचे सरकार अस्तित्वात आले.  सत्ताबदल होताच जिल्हा परिषदेच्या विकास कामांना  स्थगिती देण्यात आली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात विकासकामांवर परिणाम झाला होता. जवळपास वर्षभरानंतर ही स्थगिती उठविण्यात आली.  त्यानंतर २८ फेब्रुवारी २०२४ पर्यंत हा निधी खर्च करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यावेळी जवळपास १०० कोटींचा निधी अखर्चित होता. कालावधी कमी असल्याने प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी, निविदा प्रक्रीया याला वेळ लागत असल्याने उपलब्ध निधीपैकी ४० कोटींचा निधी कालावधीत खर्च करता आला नाही. 

अखर्चित निधी खर्च करण्यास परवानगी देण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडून शासनाला पाठविण्यात आला. परंतु त्याला शासनाकडून परवानगी मिळाली नाही. हा ४५ कोटींचा अखर्चित निधी आता हा अखर्चित निधी ३१ मे पर्यंत शासनाकडे परत पाठविण्याचे आदेश वित्त विभागाने दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.  एका विशिष्ट नमुन्यात अखर्चित निधीची माहिती पाठविण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे हा सर्व निधी शासनाकडे परत पाठवावा लागणार आहे. त्याचप्रमाणे वर्ष २०२२-२३ मधीलही अखर्चित निधी परत पाठवावा लागणार असल्याची माहिती आहे.

१४४ कोटी जादाचे मंजूर पण खर्च होणार का? जिल्हा नियोजन समितीने २०२४-२५ या वर्षात १४४ कोटींचा जादाचा निधी मंजूर केला आहे. परंतु नियोजन समितीकडून उशिरा प्राप्त होणारे नियोजन, विकास कामांना देण्यात येणारी स्थगिती यामुळे निधी खर्च होत नाही. त्यामुळे जादाचा निधी मिळूनही उपयोग काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :nagpurनागपूर