लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागरिकांनी नियमांचे पालन करणे अपेक्षित आहे. तरीही काही व्यक्तींकडून नियमांचे उल्लंघन केले जाते. अशा व्यक्तींवर महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे कारवाई सुरू आहे. पथकाने जानेवारी महिन्यात ५७९२ उपद्रवींवर कारवाई करून ४४ लाख ८४ हजार ५० रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात पथकप्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात दहाही झोनमध्ये कारवाई करण्यात आली.
जानेवारी महिन्यात उपद्रव शोध पथकाने केलेल्या कारवाईत दंड वसूल करण्यात आला आहे. हातगाड्या, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजीविक्रेते आदींनी लगतच्या परिसरात अस्वच्छता केल्याने ६८ उपद्रवींकडून २७ हजार २०० रुपये, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्या ५३ उपद्रवींकडून ५ हजार ३०० रुपये, २१ दुकानदारांकडून ८ हजार ४०० रुपये, शैक्षणिक संस्था आणि कोचिंग क्लासेसकडून २ हजार, दवाखाने, इस्पितळ आणि लॅबकडून २ हजार, सार्वजनिक ठिकाणी कचरा करण्यासाठी मॉल, उपाहारगृहे, लॉजिंग, बोर्डिंगचे हॉटेल, सिनेमा हॉल, मंगल कार्यालये, कॅटरर्स सर्व्हिस यांच्याकडून २४ हजार, शहरात विनापरवानगी जाहिरातीचे फलक, बॅनर लावण्यासाठी २ हजार, वैयक्तिक कामासाठी मंडप किंवा स्टेज टाकून वाहतुकीचा रस्ता बंद करणाऱ्या, मास्क कारवाईत ४३२६ उपद्रवींकडून २६ लाख ३० हजार ९५० रुपये वसूल करण्यात आले.
मोकळ्या जागेवर जनावरे बांधणाऱ्या ४ उपद्रवींकडून ४ हजार, सार्वजनिक ठिकाणी जनावरे, वाहने धुऊन परिसर अस्वच्छ करणाऱ्या ३ उपद्रवींकडून ३ हजार, रस्ते, वैद्यकीय व्यावसायिकांनी बायोमेडिकल वेस्ट सर्वसाधारण कचऱ्यात टाकण्यासाठी ८५ हजार, वर्कशॉप, गॅरेज व इतर यांच्याकडून ३९ हजार, बांधकाम साहित्य साठविणाऱ्या ४७३ व्यक्तींकडून ९ लाख ४६ हजार, २ बिल्डरकडून २० हजार सार्वजनिक ठिकाणी इमारतीचा मलबा टाकणाऱ्यांकडून ७१ हजार ५०० तर अन्य उपद्रवांसाठी ४५८ व्यक्तींवरील कारवाईत ९१ हजार ६०० रुपये आणि २५१ संस्थांकडून २ लाख ५१ हजार वसूल करण्यात आले.
....
महिनाभरातील झोननिहाय कारवाई
झोन कारवाई दंड वसूल
लक्ष्मीनगर ६८७ ३,९९,५००
धरमपेठ ८६८ ७,३६,७००
हनुमान ६७७ ४,३२,९००
धंतोली ४३५ ५,१५,२००
नेहरूनगर ४५२ ३,८०,९५०
गांधीबाग ४८५ ४,२०,०००
सतरंजीपुरा ३४५ ३,२८,९००
लकडगंज ६३८ ४,०७,२००
आशीनगर ५२८ ४,३८,१००
मंगळवारी ६८७ ४,२४,६००
एकूण ५७९२ ४४,८४,०५०