शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर मध्यवर्ती कारागृहात मिळाले ४४ कोरोना संक्रमित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 22:12 IST

नागपुरात बुधवारी ७३ नमुने पॉझिटिव्ह आले आहे. त्याचबरोबर कोरोना संक्रमितांची संख्या १५७८ झाली आहे. विशेष म्हणजे यातील ४४ नमुने नागपूर मध्यवर्ती कारागृहातील आहे. पॉझिटिव्ह आलेल्या नमुन्यांमध्ये कारागृहातील अधिकारी, कर्मचारी यांच्यासह कैद्यांचाही समावेश आहे.

ठळक मुद्देअनेक कैदी झाले संक्रमित : दिवसभरात शहरात ७३ ची भर

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : नागपुरात बुधवारी ७३ नमुने पॉझिटिव्ह आले आहे. त्याचबरोबर कोरोना संक्रमितांची संख्या १५७८ झाली आहे. विशेष म्हणजे यातील ४४ नमुने नागपूर मध्यवर्ती कारागृहातील आहे. पॉझिटिव्ह आलेल्या नमुन्यांमध्ये कारागृहातील अधिकारी, कर्मचारी यांच्यासह कैद्यांचाही समावेश आहे. मंगळवारी कारागृहातून १५७ नमुने घेण्यात आले होते. यात काही कै द्यांचेही नमुने होते. आज रिपोर्ट आल्यानंतर कारागृहात खळबळ उडाली. कै दी संक्रमित झाल्यामुळे कारागृह प्रशासनाची चिंता वाढली आहे.मंगळवारी अधिकाऱ्यासह नऊ कारागृहातील कर्मचारी कोरोना संक्रमित आले होते. त्यापूर्वी अस्थायी कारागृहातील एक कैदी संक्रमित झाला होता. कोरोना संक्रमित अधिकारी कर्मचाऱ्यांसोबत कैद्यांनाही उपचारासाठी मेडिकलमध्ये पाठविण्यात आले आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे. बुधवारी सर्व कैद्यांसह १०१ अधिकारी कर्मचाऱ्यांचे नमुने घेण्यात आले. याचा रिपोर्ट गुरुवारी येणार आहे.नीरी लॅबमध्ये मंगळवारी कारागृहातील १५७ नमुने घेण्यात आले. त्यात ४४ नमुने पॉझिटिव्ह आले. एम्सच्या लॅबमधून १० जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यात लॉ कॉलेज क्वारंटाईन सेंटरचे ४, वनामती क्वारंटाईन सेंटरचे ३, तर ३ अन्य परिसरातील आहे.मेयोच्या लॅबमधून ११ पॉझिटिव्ह मिळाले आहे. यात कामठीच्या मिलिटरी हॉस्पिटलचे पुन्हा ६ नमुने पॉझिटिव्ह आले आहे. त्याचबरोबर मोमीनपुरा, लोहारपुरा बजेरिया, हसनबाग, विनोबा भावेनगर, काटोल व डागा रुग्णालयातील एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. खासगी लॅबमधून आठ नमुने पॉझिटिव्ह आले आहे.

 ३८ झाले कोरोनामुक्तनागपुरात बुधवारी ३८ रुग्ण निरोगी होऊन घरी परतले. मेयो रुग्णालयातून १६ लोकांना सुटी मिळाली. यात हंसापुरी १, बजेरिया ५, शास्त्रीनगर ३, परसोडी ४, उमरेड १, सिवनी १, लष्करीबाग १ येथील रुग्णांचा समावेश आहे. मेडिकल कॉलेजमधून १९ लोकांना डिस्चार्ज मिळाला. यात नाईक तलाव- बांगलादेशचे १०, संत गाडगेबाबा नगरातील ३, पाचपावली, हसनबाग, यवतमाळ, मोमीनपुरा, अमरावती, झिंगाबाई टाकळीतील प्रत्येकी १ रुग्णांचा समावेश आहे. एम्समधून ३ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याjailतुरुंग