शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना ४३४.११ कोटी रुपयांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 23:24 IST

खरीप हंगामातील कापूस पिकांवर बोंडअळी व धानपिकावरील तुडतुडा किडीच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना मदत जाहीर केली होती. त्यानुसार नागपूर विभागातील ४ लाख ९९ हजार ७१५ बाधित शेतकऱ्यांना ४३४ कोटी ११ लक्ष ८५ हजार रुपयांच्या मदतीचे वाटप पूर्ण झाले आहे.

ठळक मुद्दे४ लाख ९९ हजार ७१५ बाधित शेतकऱ्यांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : खरीप हंगामातील कापूस पिकांवर बोंडअळी व धानपिकावरील तुडतुडा किडीच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना मदत जाहीर केली होती. त्यानुसार नागपूर विभागातील ४ लाख ९९ हजार ७१५ बाधित शेतकऱ्यांना ४३४ कोटी ११ लक्ष ८५ हजार रुपयांच्या मदतीचे वाटप पूर्ण झाले आहे.खरीप हंंगाम २०१७ मध्ये कापूस पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम झाला होता. तसेच पूर्व विदर्भातील धान उत्पादक क्षेत्रात तुडतुडा किडीच्या प्रादुर्भावामुळे सुद्धा शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मदत जाहीर केली होती. त्यानुसार शासनाकडून तीन हप्त्यात मदत प्राप्त झाली होती. ती महसूल विभागातर्फे शेतकऱ्यांना जिल्हानिहाय वाटप करण्यात येऊन प्रत्यक्ष वितरित करण्यात आली. तसेच तिसऱ्या टप्प्यातील मदतीचे वाटपसुद्धा सुरू आहे.कापूस पिकावरील बोंडअळी व धानपिकावर झालेल्या तुडतुडा किडीच्या नुकसानीसंदर्भात झालेल्या नुकसानीच्या सर्वेक्षणानुसार जिल्हानिहाय शासनाकडे ५३७ कोटी ६६ लाख २० हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार संपूर्ण निधी प्राप्त झाला आहे आणि त्यानुसार मदतीचे वाटप अंतिम टप्प्यात असून आतापर्यंत ८० टक्क्यांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना मदतीचे वाटप पूर्ण झाले आहे.शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीपोटी मदतीसाठी नागपूर जिल्ह्यातील ८५ हजार २६० शेतकऱ्यांना ४६ कोटी ८३ लक्ष रुपयांचे वाटप पूर्ण झाले आहे. वर्धा जिल्ह्यातील १ लाख ४४ हजार १४९ शेतकऱ्यांना १०२ कोटी ५२ लाख रुपयांचे वाटप पूर्ण झाले आहे. गोंदिया जिल्ह्यातील १ लाख ४२४ शेतकऱ्यांना ३७ कोटी २७ लक्ष ७६ हजार, चंद्रपूर जिल्ह्यातील ८६ हजार ३६५ शेतकऱ्यांना १४९ कोटी ९७ लक्ष ७८ हजार, भंडारा जिल्ह्यातील ६३ हजार ५४७ शेतकरी सभासदांना ६५ कोटी ४३ लक्ष ९५ हजार तर गडचिरोली जिल्ह्यातील १९ हजार ९७० शेतकरी सभासदांना ३२ कोटी ७ लक्ष रुपयांचे वाटप पूर्ण झाले आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीcottonकापूस