लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : पाेलिसांनी काेळशाची चाेरटी वाहतूक करणारे तीन ट्रक पकडले. यात चाैघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून ४३ टन काेळसा व ट्रक असा एकूण ४१ लाख १५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
कामठी पाेलिसांच्या पथकाने साेमवारी (दि. ४) रात्री गस्तीदरम्यान लिहिगाव शिवारात एमएच-४०/बीएल-३१२० व अन्य एक ट्रक थांबवून झडती घेतली. त्या दाेन्ही ट्रकमध्ये त्यांना अनुक्रमे ८ व १० टन असा एकूण १८ टन काेळसा असल्याचे आढळून आले. ताे संपूर्ण काेळसा चाेरीचा असून, त्याची अवैध वाहतूक असल्याचे चाैकशीत स्पष्ट हाेताच पाेलिसांनी दाेन्ही ट्रक ताब्यात घेतले. यात परशुराम गाैतम (२९, रा. कांद्री कन्हान, ता. पारशिवनी) व उमेंद्र गाैतम (३४, रा. कन्हान, ता. पारशिवनी) या दाेघांना अटक केली. त्यांच्याकडून १८ टन काेळसा व दाेन ट्रक असा एकूण २९ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
दरम्यान, पाेलिसांनी मंगळवारी (दि. ५) सकाळी कामठी शहरातील कमसरी बाजार परिसरात नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या एमएच-१८/एए-१४६१ क्रमांकाचा ट्रक थांबवून झडती घेतली. त्यात काेळसा असल्याचे तसेच ताे काेळसा चाेरीचा असल्याचे स्पष्ट हाेताच पाेलिसांनी शेख आसिफ शेख नजीर (२८, रा. राळेगाव, जिलहा यवतमाळ) व मिथून नडार (३३, रा. मनसर, ता. रामटेक) या दाेघांना अटक केली त्यांच्याकडून २५ टन काेळसा व ट्रक असा एकूण ११ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या दाेन्ही कारवाईमध्ये चाैघांना अटक करून ४३ टन काेळसा व तीन ट्रक असा एकूण ४१ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पाेलीस निरीक्षक संजय मेंढे यांनी दिली. याप्रकरणी कामठी (नवीन) पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई सहायक पाेलीस निरीक्षक कन्नाके यांच्या नेतृत्वातील पथकाने केली.