शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

४२ लाखाच्या लाचेचे प्रकरण : हायकोर्टाने शिवाजीराव मोघे यांना दिलासा नाकारला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 21:04 IST

आश्रमशाळेला परवानगी मिळवून देण्याकरिता ४२ लाख रुपये लाच घेतल्याच्या तक्रारीचा खटला रद्द करण्याची माजी पालकमंत्री शिवाजीराव मोघे व विजय आनंद मोघे यांची विनंती मंजूर करण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी नकार दिला.

ठळक मुद्देतक्रार रद्द करण्याची विनंती नामंजूर

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : आश्रमशाळेला परवानगी मिळवून देण्याकरिता ४२ लाख रुपये लाच घेतल्याच्या तक्रारीचा खटला रद्द करण्याची माजी पालकमंत्री शिवाजीराव मोघे व विजय आनंद मोघे यांची विनंती मंजूर करण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी नकार दिला. त्यामुळे शिवाजी मोघे व विजय मोघे यांनी यासंदर्भातील अर्ज मागे घेतला.प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व पुष्पा गणेडीवाला यांच्यासमक्ष अंतिम सुनावणी झाली. न्यायालयाच्या निर्णयामुळे मोघे यांना चपराक बसली. संबंधित तक्रार खटला यवतमाळ जेएमएफसी न्यायालयात प्रलंबित आहे. त्या खटल्यात देवानंद नरसिंग पवार हे तिसरे आरोपी आहेत. ऐनुद्दीन शमसुद्दीन सोळंकी यांनी हा तक्रार खटला दाखल केला असून ते कुर्लीचे माजी सरपंच आहेत. आश्रमशाळेला परवानगी मिळवून देण्याकरिता शिवाजीराव मोघे, विजय मोघे व देवानंद पवार यांनी २५ मार्च २००० रोजी कुरली गावात ४२ लाख रुपयांची लाच घेतली. त्यानंतर तिघांनी आश्रमशाळेला परवानगी मिळवून दिली नाही आणि पैसेही परत केले नाही, असा सोळंकी यांचा आरोप आहे. सोळंकी यांच्यातर्फे अ‍ॅड. अक्षय नाईक यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयShivajirao Mogheशिवाजीराव मोघेCorruptionभ्रष्टाचार