शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

४२ उमेदवारांची अनामत जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 01:06 IST

विजयासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या उमेदवारांना आपली अनामतही वाचविता आलेली नाही. नागपूर लोकसभेत २८ उमेदवारांची तर रामटेकमध्ये १४ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली.

ठळक मुद्देनागपूरमध्ये २८ तर रामटेकमध्ये १४

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विजयासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या उमेदवारांना आपली अनामतही वाचविता आलेली नाही. नागपूर लोकसभेत २८ उमेदवारांची तर रामटेकमध्ये १४ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली.नागपुरात ३० उमेदवार रिंगणात होते. भाजपाचे राष्ट्रीय नेते नितीन गडकरी यांनी काँग्रेसचे नाना पटोले यांना पराभूत केले. काँग्रेसचे उमेदवार वगळता रिंगणातील उर्वरित २८ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. बसपाचे मोहम्मद जमाल व बहुजन वंचित बहुजन आघाडीचे सागर डबरासे यांनाही आपली अनामत राखता आली नाही. कही अपक्ष उमेदवारांना तर अत्यल्प मते मिळाली आहेत. अनेकांना पाचशेचाही टप्पा गाठता आला नाही.रामटेकमुळे शिवसेनेचे कृपाल तुमाने यांनी पुन्हा गड राखला. काँग्रेसचे किशोर गजभिये यांना पराभवाला सामोरे जावे लागले. येथे गजभिये वगळता उर्वरित १४ उमेदवारांची अनामत जप्त झाली. बसपाचे सुभाष गजभिये व वंचित बहुजन आघाडीच्या किरण रोडगे -पाटणकर यांनाही अनामत वाचविता आली नाही.अशी होते अनामत जप्त आयोगाच्या नियमानुसार एकूण वैध मतांपैक १/६ ( सरासरी ) हजार मते घेणाऱ्या पराभूत उमेदवारांना त्यांची अनामत रक्क म परत दिली जाते. हा टप्पा पार न करणाऱ्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त होते. या नियमाचा आधार घेतला तर पराभूत उमेदवारांपैकी काँग्रेसचे नाना पटोले वगळता सर्व उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. ज्या प्रमाणात अपक्ष रिंगणात होते त्यांची संख्या लक्षात घेतली तर मोठ्या प्रमाणात मत विभाजन होईल व त्याचा फटक प्रमुख पक्षांना बसेल असा अंदाज होता. मात्र या उमेदवारांना मिळालेली मते पाहता तसे झाले नसल्याचे स्पष्ट होते. उलट उमेदवारांची संख्या वाढल्याने निवडणूक यंत्रणेच्या कामात वाढ झाली. मतमोजणीच्या विलंबासाठी हे देखील एक कारण आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालnagpur-pcनागपूरramtek-pcरामटेक