शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus; विदर्भात नव्या ४१ रुग्णांची नोंद; रुग्णसंख्या १२१६

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 21:06 IST

विदर्भात उन्ह वाढत असताना रुग्णांची संख्या कमी झालेली नाही. रविवारी पुन्हा ४१ रुग्णांची भर पडली. एकूण रुग्णांची संख्या १२१६वर पोहचली आहे. विशेष म्हणजे, आज पुन्हा अकोल्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद व एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्देअकोल्यात पुन्हा एक मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भात उन्ह वाढत असताना रुग्णांची संख्या कमी झालेली नाही. रविवारी पुन्हा ४१ रुग्णांची भर पडली. एकूण रुग्णांची संख्या १२१६वर पोहचली आहे. विशेष म्हणजे, आज पुन्हा अकोल्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद व एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. विदर्भात मृतांची संख्या ५१ झाली आहे. हॉटस्पॉट ठरलेल्या अकोला जिल्ह्यात १९ रुग्ण पॉझिटिव्ह आले. या रुग्णांसह कोरोनाबाधितांची संख्या ३९७ वर पोहचली आहे. शिवाय, आज पुन्हा एका रुग्णाचा मृत्यू झाला. आतापर्यंत २४ मृत्यू झाले आहेत. यात एका रुग्णाची आत्महत्या आहे. या जिल्ह्याने मृताच्या संख्येत नागपुरला मागे टाकले आहे. आता रुग्णसंख्येतही मागे टाकते की काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नागपुरात सहा रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात एक महिला डॉक्टर असल्याने खळबळ उडाली. डॉक्टर पॉझिटिव्ह येण्याचे हे दुसरे प्रकरण आहे. या डॉक्टरची ड्युटी आमदार निवास या अलगीकरण कक्षात होती. परंतु १५ दिवसांपासून ती सुटीवर होती. दोन दिवसांपासून लक्षणे असल्याने शनिवारी तिने नमुने तपासणीसाठी दिले असता आज पॉझिटिव्ह अहवाल आला. या रुग्णासह मोमीनपुरा येथील दोन, गड्डीगोदाम येथील एक, जवाहरनगर येथील दोन असे सह रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णांची संख्या ४२३ झाली आहे. नागपुरात आतापर्यंत सातच मृत्यूची नोंद आहे. अकोल्यासोबतच अमरावती जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढत आहे. १२ नव्या रुग्णांचे निदान झाले. रुग्णांची संख्या १६३ वर पोहचली आहे. भंडाऱ्यातही आणखी चार रुग्ण पॉझिटिव्ह आले. कोरोनाबाधितांची रुग्णांचा आलेख वाढत आहे. चार नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यातील तीन जिल्हा बाहेरील असून एक जिल्ह्यातील आहे. रुग्णसंख्या १३वर पोहचली आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस