शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य विम्यापेक्षा कोविड पॉलिसीच्या प्रमाणात ४० टक्के वाढ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2020 10:34 IST

सर्वसाधारण आरोग्य विमा योजनेपेक्षा कोविड विम्याचा हप्ता कमी असल्याने गेल्या महिनाभरात याचे प्रमाण जवळपास ४० टक्क्यांपर्यंत वाढले आहे.

ठळक मुद्देकोविड रुग्ण घेताहेत योजनेचा लाभ

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जिल्ह्यात कोरोना स्थिती गंभीर झाल्याने आणि मृत्यूदर वाढल्याने कोविड पॉलिसी काढण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. त्यामुळे साधारण आरोग्य विम्यापेक्षा कोविड पॉलिसीचे प्रमाण जवळपास ४० टक्क्यांनी वाढले आहे. मात्र अशा विम्याचा लाभ प्रत्यक्ष रुग्णालयात घेण्याचे प्रमाण ३ टक्के असल्याची माहिती आहे.खासगी रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध नसल्याचे कारण सांगून साधारण आरोग्य विम्याचा अर्थात मेडिक्लेमचा फायदा रुग्णांना होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ठराविक कोविड पॉलिसी काढण्याकडे लोकांचा कल वाढल्याचे एजंटांनी सांगितले.कोविड पॉलिसी ऑनलाईन आणि एजंटामार्फत काढण्याचे प्रमाण वाढले आहे. सर्वसाधारण आरोग्य विमा योजनेपेक्षा कोविड विम्याचा हप्ता कमी असल्याने गेल्या महिनाभरात याचे प्रमाण जवळपास ४० टक्क्यांपर्यंत वाढले आहे. ऑनलाईन विमा काढणाऱ्यांचा विचार केला तर हे प्रमाण आणखी जास्त असू शकते. विमा लागू होऊन त्याचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना कमी वेळ मिळाल्याने प्रत्यक्ष रुग्णालयातील माहितीनुसार अशा कोविड विम्याचा लाभ घेण्याचे प्रमाण ३ टक्के असल्याचे समजते. पुढील काही महिन्यात यात वाढ होण्याची शक्यता आहे. अनेक विमा कंपन्या कोविड पॉलिसी घेऊन स्पर्धेत उतरल्या आहेत.एजंटांनी सांगितले, कोविड विमा काढण्याकडे लोकांचा कल वाढत आहे. साडेनऊ महिन्यांसाठी ही पॉलिसी असून, हप्ता, वेटिंग काळ कमी असल्याने तो सहज घेता येतो. सध्या कोरोना काळात याची गरज वाढली आहे. सध्या सर्वसाधारण आरोग्य विम्यातच कोविडचा समावेश असलेल्या योजनेकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. कोरोना महामारीमुळे यात वाढ होताना दिसत आहे. लोक आरोग्याबाबत अधिक सतर्क झाल्याचे चित्र आहे.कोविड विम्याकडे का वाढतोय कल :- कोविड विम्याचा हप्ता हा नियमित आरोग्य विम्याच्या तुलनेत २२ ते २५ टक्के इतकाच आहे.- कोविड विमा मंजुरीसाठी प्रतीक्षा काळ १५ दिवसांचा आहे. अन्य आरोग्य विम्यात तो ३० दिवसांचा असतो.- कोविड विमा हा कॅशलेस नसला तरी त्याचा परतावा लगेच मिळतो.- हा विमा कोणत्याही वयोगटातील व्यक्तीस काढता येतो.- जुनाट आजार वगळता अन्य व्यक्तीसाठी तो सहजसुलभ आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस