शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

'आपली बस'च्या ताफ्यात लवकरच ४० इलेक्ट्रीक बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 23:16 IST

केंद्रीय नीती आयोगाने नागपूर महापालिकेच्या परिवहन विभागाला १०० इलेक्ट्रीक बस देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात महापालिकेला पत्र प्राप्त झाले आहे. पहिल्या टप्प्यात यातील ४० बस लवकरच ‘आपली बस’च्या ताफ्यात दाखल होत आहे.

ठळक मुद्देमहिन्याला एक कोटींचा खर्च वाढणार : महापौरांचे निविदा काढण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्रीय नीती आयोगाने नागपूर महापालिकेच्या परिवहन विभागाला १०० इलेक्ट्रीक बस देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात महापालिकेला पत्र प्राप्त झाले आहे. पहिल्या टप्प्यात यातील ४० बस लवकरच ‘आपली बस’च्या ताफ्यात दाखल होत आहे. १५ दिवसात याबाबतच्या निविदा काढण्यात येणार आहे.पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतुकीला चालना देण्यासाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी प्रयत्नशील आहेत. यातूनच महापालिकेने इलेक्ट्रीक बस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. इलेक्ट्रीक बस खरेदी करण्यासाठी महापालिकेच्या तिजोरीवर कोणत्याही स्वरूपाचा आर्थिक बोजा पडणार नाही. संबंधित बस ऑपरेटरलाच या बस खरेदी करावयाच्या आहेत. मात्र असे असले तरी बस संचालनाचा खर्च महापालिकेला करावयाचा. यामुळे दर महिन्याला एक कोटींचा खर्च वाढणार आहे. महापालिका आपली बस संचालनावर दर महिन्याला सात कोटी खर्च करते. यात पुन्हा एक कोटीची भर पडणार आहे. परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी महापौर संदीप जोशी यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली. जोशी यांनी ४० बससाठी निविदा काढण्याचे निर्देश दिले.इलेक्ट्रीक बसमुळे महापालिकेला प्रति किलोमीटर खर्च कमी येईल. त्यामुळे डिझेल बसवर होणाऱ्या खर्चात इलेक्ट्रीक बस चालविणे शक्य आहे. मनपाच्या आपली बसच्या ताफ्यात महिलांसाठी इलेक्ट्रिकवर संचालित पाच तेजस्विनी बस यापूर्वीच दाखल झालेल्या आहेत. शहरातील वर्दळीच्या मार्गावर या बसेस धावत आहेत. यामुळे महिलांना चांगली सुविधा झाली आहे. आता पुन्हा ४० इलेक्ट्रीक बस धावणार आहेत.खासगी बस शहराबाहेर रोखणारशहरात होत असलेली वाहतूक कोंडी विचारात घेता खासगी बस शहराबाहेर रोखण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या विचाराधीन आहे. यासाठी शहराबाहेर वाडी, बुटीबोरी व भंडारा रोड येथे महापालिका जागा उपलब्ध करणार आहे. या ठिकाणाहून प्रवाशांना शहरात येण्यासाठी आपली बस उपलब्ध राहील. यादृष्टीने बसचे वेळापत्रक तयार केले जाणार आहे. यामुळे महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होईल. तसेच शहरातील वाहतुकीची कोंडी कमी होण्याला मदत हाईल. याबाबतचे नियोजन सुरू असल्याची माहिती महापौर संदीप जोशी यांनी दिली.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाelectric vehicleवीजेवर चालणारं वाहन