शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
ईशनंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटंबाचा धक्कादायक खुलासा
3
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
4
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
5
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
6
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
7
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
8
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
9
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
10
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
11
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
12
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
13
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
14
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
15
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
16
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
17
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
18
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
19
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
20
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय रॅँकिंगमध्ये नागपूरच्या ४ शिक्षणसंस्था

By admin | Updated: April 3, 2017 22:35 IST

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या नॅशनल इन्स्टिट्यूट रॅकिंग फ्रेमवर्क अंतर्गत देशभरातील विद्यापीठ

 ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 3 -  केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या  नॅशनल इन्स्टिट्यूट रॅकिंग फ्रेमवर्क अंतर्गत देशभरातील विद्यापीठ व शैक्षणिक संस्थांचे  रँकिंग  जाहीर करण्यात आले. यात अभियांत्रिकी व फार्मसी क्षेत्रात नागपुरातील ४ शैक्षणिक संस्थांचा पहिल्या शंभरात समावेश आहे. मात्र  व्हीएनआयटी  (विश्वैश्वरैय्या इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी) सोडले तर नागपूरातील एकाही संस्थेला पहिल्या ५० मध्ये  रँकिंग  मिळालेले नाही.  व्हीएनआयटी चा देशात ४२ वा क्रमांक आहे. मागील वर्षी  व्हीएनआयटी  १९ व्या स्थानावर होते.  टॉप  १०० विद्यापीठांमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा कुठेही समावेश नाही.देशातील विद्यापीठांचे तसेच विविध शैक्षणिक संस्थाचे  रँकिंग ठरविण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने प्रस्ताव मागविले होते. देशभरातील विविध विद्यापीठे व महाविद्यालयांनी हे प्रस्ताव जानेवारी महिन्यात सादर केले होते. नागपूर विद्यापीठ तसेच जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांचादेखील यात समावेश होता.सोमवारी जाहीर झालेल्या यादीत नागपूरातील सर्वच संस्था राष्ट्रीय पातळीवर माघारल्याचे दिसून आले.  व्हीएनआयटीचा देशातील सर्वोत्तम अभियांत्रिकी संस्थांमध्ये ४२ वा क्रमांक आहे. अभियांत्रिकी संस्थांच्याच यादीमध्ये ह्यआरकेएनईसीह्ण (रामदेवबाबा कमला नेहरु इंजिनिअरींग कॉलेज) व जी.एच.रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालय यांचा क्रमांक अनुक्रमे ६४ व ६७ वा आहे. देशातील  टॉप  फार्मसी महाविद्यालायंमध्ये नागपूरातील  गुरुनानक कॉलेज आॅफ फार्मसीला ४९  रँकिंग मिळाले आहे. मध्य भारतातील शैक्षणिक हब म्हणून नागपूर शहर उदयाला येत आहे. अभियांत्रिकी, वैद्यकीय व फार्मसीमधील शैक्षणिक संस्थांची संख्या वाढली असली तरी दर्जा मात्र अद्याप हवा तसा सुधारलेला नाही, हेच या  रँकिंगमधून स्पष्ट होत आहे.नागपूर विद्यापीठ शंभरात नाही  नॅकचा  अ दर्जा मिळविणाऱ्या नागपूर विद्यापीठाला मात्र  रॅकिंग  मिळविण्यात यश आलेले नाही. राज्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, डी.वाय.पाटील विद्यापीठ, भारती विद्यापीठ, सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ,यांना या यादीत स्थान मिळाले आहे.  शहरातील संस्थांचे  रँकिंग अभियांत्रिकीसंस्था रँकिंगव्हीएनआयटी ४२रामदेवबाबा अभियांत्रिकी महाविद्यालय ६४जी.एच.रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालय६७फार्मसी संस्था रँकिंगगुरुनानक कॉलेज आॅफ फार्मसी४९