शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

नागपूर जिल्ह्यातील ८० टक्के पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 11:12 IST

पावसाची दडी, मध्यंतरी कोसळलेला संततधार पाऊस व प्रतिकूल वातावरणातून वाचलेली नागपूर जिल्ह्यातील कपाशी, सोयाबीन, धान व इतर खरीप पिके परतीच्या पावसाने उद्ध्वस्त केली आहेत.

ठळक मुद्देपरतीच्या पावसाचा फटकाबोंडामधील सरकीसह सोयाबीन अंकुरले

सुनील चरपे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सुरुवातीला पावसाची दडी, मध्यंतरी कोसळलेला संततधार पाऊस व प्रतिकूल वातावरणातून वाचलेली नागपूर जिल्ह्यातील कपाशी, सोयाबीन, धान व इतर खरीप पिके परतीच्या पावसाने उद्ध्वस्त केली आहेत. सततचा पाऊस आणि वातावरणातील दमटपणा यामुळे कपाशीची बोंडे सडली असून, आत असलेल्या कापसातील सरकी व शेंगांमधील सोयाबीनचे दाणे अंकुरले आहे. धानाची पिके शेतातच लोळली असून, त्याच्या लोंब्यामधील धान भरण्याची शक्यता मावळली आहे. शिवाय, उभ्या असलेल्या धानाच्या पिकावर मोठ्या प्रमाणात करपा या बुरशीजन्य रोगाचा आणि तुडतुड्यांचाही प्रादुर्भाव झाला आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील ८० टक्के पिकांचे नुकसान झाल्याची माहिती कृषी व महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी खासगीतबोलताना दिली.चालू खरीप हंगामात जिल्ह्यात अंदाजे २ लाख ५० हजार हेक्टरमध्ये कपाशीची लागवड, किमान एक लाख हेक्टरमध्ये सोयाबीनची पेरणी आणि जवळपास ९२४ हेक्टरमध्ये धानाची रोवणी करण्यात आली. सुरुवातीला पावसाने दडी मारल्याने पेरणी व रोवणीला आधीच विलंब झाला होता. त्यातच मध्यंतरी संततधार पाऊस बरसला. या काळात ढगाळ व दमट वातावरणामुळे एकीकडे सूर्यप्रकाशाअभावी पिकांची वाढ खुंटली होती तर दुसरीकडे विविध रोग व किडींचा प्रादुर्भाव झाला होता. पावसाने सवड देताच शेतकऱ्यांनी ही संपूर्ण पिके योग्य आंतरमशागत, खतांचे डोज, कीटकनाशके व मायक्रोन्यूट्रियन्टची फवारणी करून वाचविली. त्यामुळे त्यांचा उत्पादनखर्चही वाढला होता.चार दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसाच्या सरींमुळे कापणीला आलेले व कापणी केलेले सोयाबीन भिजले. त्यातच बुरशीमुळे शेंगा काळवंडल्या असून, शेंगांमधील दाणेही अंकुरले. कपाशीची बोंडं सडल्याने तसेच फुलोर गळाल्याने महत्त्वाचे पहिले दोन वेचे हातातून गेले. बोंड दाबल्यावर त्यातून पाणी बाहेर येण्याची तसेच आतील सरकी अंकुरण्याची ही अलीकडच्या काळातील पहिलीच वेळ असल्याची माहिती काही वयोवृद्ध व अनुभवी शेतकºयांनी दिली. मौदा, रामटेक व कामठी तालुक्यातील लोंब्यावर व गर्भार अवस्थेतील धानाचे पीक लोळले आहे. त्यामुळे त्यातील धान भरणार नाही. शिवाय, मौदा तालुक्यातील धानाच्या पिकावर करपा व तुडतुड्यांचाही प्रादुर्भाव झाला आहे. परिणामी, या सर्व पिकांची प्रत खालावल्याने त्यांना बाजारात कवडीमोल भावाने विकावे लागणार आहे. नुकसानग्रस्त भागाचे सर्वेक्षण व पंचनामे करण्याची मागणी केली जात असली तरी प्रशासनाने ही प्रक्रिया अद्यापही सुरू केली नाही.हमीभाव व खरेदी केंद्रेकेंद्र शासनाने कापसाचा हमीभाव प्रति क्विंटल ५,५५० रुपये (लांब धागा) व ५,२५५ रुपये (मध्यम धागा), सोयाबीन (पिवळी) ३,७१० रुपये, धान १,८१५ रुपये (सर्वसाधारण), १,८३५ रुपये (ग्रेड ए), मूग ७,०५० रुपये, उडीद ५,७०० रुपये जाहीर केले आहे. सध्या खुल्या बाजारात चांगल्या प्रतिच्या सोयाबीनला प्रति क्विंटल २,२२० ते २,७०० रुपये भाव मिळत आहे. कापसाचा उत्पादनखर्च किमान ७,२५० रुपये प्रति क्विंटल असताना हमीभाव मात्र कमी जाहीर करण्यात आला. राज्यात कापसाच्या खरेदीला अद्याप सुरुवात झाली नसली तरी बुºहाणपूर (मध्य प्रदेश) येथे कापसाला ३,७१० ते ४००० रुपये आणि पंजाब व हरियाणामध्ये ४,९०० ते ५,१०० रुपये भाव मिळत आहे. ही स्थिती मूग व उडिदाची आहे. शेतमालाचे खुल्या बाजारातील भाव हमीभावापेक्षा कमी असल्याने शासनाने हमीभाव खरेदी केंद्र सुरू करणे गरजेचे आहे. अद्याप कुठेही खरेदी केंद्र सुरू करण्यात न आल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.शेतकरी दुहेरी संकटातपावसामुळे पिके खराब झाल्याने शेतकरी आधीच संकटात सापडले आहेत. त्यातच शेतमालाला खुल्या बाजारात कमी भाव मिळत आहे. शेतकºयांना सोयाबीन (चांगल्या प्रतिचे) किमान ५०० ते १००० रुपये, उडीद व मूग ५०० ते ७०० रुपये आणि कापूस १,५०० ते २,००० रुपये कमी भावाने विकावे लागत आहे.४प्रतिकूल वातावरणामुळे बहुतांश पिकांचा उत्पादनखर्च वाढला आहे. पावसामुळे प्रतवारी खालावलेला शेतमाल कवडीमोल भावाने विकावा लागणार आहे. खुल्या बाजारात मिळणारा कमी भाव व वाढता उत्पादनखर्च लक्षात घेता, यावर्षी शेतकरी दुहेरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

टॅग्स :agricultureशेती