शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

कॉटन मार्केटमधील ३९ अडतियांना आठ बाजारात व्यवसायाची परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 22:51 IST

जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या आदेशानंतर कॉटन मार्केटमधील ३९ अडतियांना शहरातील नवीन आठ बाजारात व्यवसायाची परवानगी मिळाली आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, शनिवारपासून बाजार भरणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या आदेशानंतर कॉटन मार्केटमधील ३९ अडतियांना शहरातील नवीन आठ बाजारात व्यवसायाची परवानगी मिळाली आहे. यशवंत स्टेडियम धंतोली, ग्रेट नाग रोड, नागनदीजवळ भोला गणेशजवळ, टायगर गॅप मैदान सदर, ललित कला मैदान चंदननगर, कलोडे महाविद्यालय बेलतरोडी रोड, एनआयटी मैदान नरेंद्रनगर, भगवाननगर मैदान पोस्ट ऑफिसजवळ आणि क्रीडा संकुल, पार्किंगची जागा, मानकापूर अशी बाजाराच्या जागांची नावे आहेत.आठ बाजारात पाच जणांच्या अडतियांच्या आठ समूहाला व्यवसायाची परवानगी दिली आहे. शुक्रवारी भाजी बाजार नियमित बंद असल्याने शनिवारपासून सकाळी ८ पासून दुपारी २ वाजेपर्यंत बाजारात खरेदी-विक्री व्यवहार होणार आहे. दोन वाहनांमध्ये कमीतकमी ५० फूटाचे अंतर आवश्यक राहील. प्रत्येक अडत्याला जास्तीत जास्त दोन वाहनांमध्ये भाजी आणण्यास परवानगी राहील. भाजी वाहतूक करणारे वाहन तात्काळ खाली करून रवाना करण्यात येईल. त्याठिकाणी कुणीही चिल्लर भाजी विक्रीकरिता दुकान लावणार नाही. प्रत्येक अडत्याला ओळखपत्र व आदेशाची प्रत सोबत ठेवणे आवश्यक आहे. भाजीची वाहतूक करणे सुकर व सोयीचे होईल या दृष्टीने वाहतूक करणाºया वाहनांना फलक लावण्यात यावे आदींसह अनेक अटींचे पालन अडतियांना करावे लागेल.कोरोना व्हायरसच्या संसर्गाच्या भीतीने मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महात्मा फुले भाजी बाजार (कॉटन मार्केट) खरेदी-विक्रीदरम्यान होणारी गर्दी लक्षात घेता भाजी विक्रीसाठी बंद केला होता. तेव्हापासून भाज्या उत्पादक शेतकरी, व्यापारी आणि अडतियांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे महात्मा फुले सब्जी फ्रूट अडतिया असोसिएशनने १४ एप्रिलला व्यवसाय करण्यासाठी शहरात विविध ठिकाणी जागा उपलब्ध करून देण्याची विनंती जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी शहरात आठ ठिकाणी भाज्यांच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय करण्याची परवानगी गुरुवारी दिली.यापूर्वी मनपा आयुक्तांनी शहरात सुरू केलेले काही बाजार सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा होत असल्याने आणि अतोनात गर्दीमुळे बंद केले होते. आता जिल्हाधिकाऱ्यांनी नव्याने आदेश देऊन काही बाजार सुरू केले आहेत. त्याचा फायदा ग्राहकांना होईल, शिवाय शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान होणार नाही, असे असोसिएशनचे सचिव राम महाजन यांनी सांगितले.

टॅग्स :vegetableभाज्याMarketबाजार