शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील आरटीओ कर्मचाऱ्यांना ३८ वर्षांनंतर दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 21:00 IST

प्रादेशिक परिवहन विभागातील ११ कनिष्ठ लिपिकांना बढतीच्या लढ्यात ३८ वर्षांनंतर दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणच्या नागपूर खंडपीठाने या कनिष्ठ लिपिकांना ५ सप्टेंबर १९८० पासून वरिष्ठ लिपिकपदी बढती दिल्याचे गृहित धरण्याचे व त्यांना चार महिन्यांत संबंधित सर्व प्रकारचे लाभ देण्याचे आदेश राज्य शासनाला दिले आहेत.

ठळक मुद्देप्रशासकीय न्यायाधिकरण : वरिष्ठ लिपिकपदी बढती मिळाली

आॅनलाईन लोकमतनागपूर : प्रादेशिक परिवहन विभागातील ११ कनिष्ठ लिपिकांना बढतीच्या लढ्यात ३८ वर्षांनंतर दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणच्या नागपूर खंडपीठाने या कनिष्ठ लिपिकांना ५ सप्टेंबर १९८० पासून वरिष्ठ लिपिकपदी बढती दिल्याचे गृहित धरण्याचे व त्यांना चार महिन्यांत संबंधित सर्व प्रकारचे लाभ देण्याचे आदेश राज्य शासनाला दिले आहेत.या कर्मचाऱ्यांमध्ये माधव नारदोडकर, निरंजन कोकर्डेकर, नारायण कारमोरे, अनंत दाडिलवार, गोविंद खरे, व्ही. एम. चिंचाळकर, एस. के. बनाफर, सुनंदा पेंढारकर, गंगाधर करंजकर, जगन श्रीवास व चंद्रशेखर जोशी यांचा समावेश आहे. न्यायाधिकरणचे उपाध्यक्ष जे. डी. कुलकर्णी यांनी सर्वांचे अर्ज मंजूर करून वरीलप्रमाणे आदेश दिले.सेवाज्येष्ठता यादीनुसार पात्र असतानाही या कर्मचाऱ्यांना बढती मिळाली नव्हती. परंतु त्यांच्यापेक्षा सेवाज्येष्ठतेत कनिष्ठ असलेल्या दोन लिपिकांना ५ सप्टेंबर १९८० पासून बढती देण्यात आली होती. या कर्मचाऱ्यांनी बढतीसाठी वारंवार निवेदने देऊनही काहीच फायदा झाला नाही. दरम्यान, त्यांना ५ सप्टेंबर १९८० ऐवजी ३१ जुलै १९८९ पासून बढती देण्याची शिफारस करण्यात आली. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी न्यायाधिकरणात धाव घेऊन ५ सप्टेंबर १९८० पासून बढती मागितली होती. कर्मचाऱ्यांतर्फे अ‍ॅड. तुषार मंडलेकर यांनी बाजू मांडली.

 

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसCourtन्यायालय