शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यातील ३८ ग्रामपंचायतींनी केला १०.२६ लाखाचा वीज भरणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 22:36 IST

पथदिव्यांच्या वीजबिलांची थकबाकी असलेल्या ग्रामपंचायींसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या स्वनिधीतून अथवा १४ व्या वित्त आयोग किंवा इतर निधीतून या थकबाकीचा भरणा करण्याच्या सूचना महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागातर्फे राज्यभरातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना करण्यात आल्या होत्या, त्यास प्रतिसाद देत जिल्ह्यातील ३८ ग्रामपंचायतींनी १० लाख २६ हजाराचा भरणा करीत होणारी गैरसोय टाळली आहे.

ठळक मुद्देपथदिव्यांचे थकीत वीजबिल : आवाहनाला प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : पथदिव्यांच्या वीजबिलांची थकबाकी असलेल्या ग्रामपंचायींसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या स्वनिधीतून अथवा १४ व्या वित्त आयोग किंवा इतर निधीतून या थकबाकीचा भरणा करण्याच्या सूचना महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागातर्फे राज्यभरातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना करण्यात आल्या होत्या, त्यास प्रतिसाद देत जिल्ह्यातील ३८ ग्रामपंचायतींनी १० लाख २६ हजाराचा भरणा करीत होणारी गैरसोय टाळली आहे.ग्रामविकास विभागातर्फे २८ फेब्रुवारी २०१८ रोजी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अति-तात्काळ असा शेरा असलेल्या पत्रात सदर सूचना करण्यात आली होती. संपूर्ण राज्यात ग्रामपंचायत आणि नगर पंचायतींकडे पथदिव्यांच्या वीजबिलापोटी मोठ्या प्रमाणात थकबाकी असून ही थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरण कधीही या पथदिव्यांच्या वीजपुरवठा खंडित करु शकते, अशी शक्यता वर्तविली होती, यामुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या स्वनिधीतून अथवा १४ व्या वित्त आयोग किंवा इतर निधीतून या थकबाकीचा भरणा करण्याच्या सूचना या पत्रात करण्यात आल्या होत्या. या पत्राला सकारात्मक प्रतिसाद देत नागपूर जिल्ह्यातील ३८ ग्रामपंचायतींनी १० लाख २६ हजाराचा भरणा करीत होणारी गैरसोय टाळली आहे. यात मौदा विभागातील सर्वाधिक ग्रामपंचायतींचा समावेश आहेग्रामविकास विभागापाठोपाठ सावनेर पंचायत समितीनेही सावनेर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना पत्र देत ग्रामपंचायत हद्दीतील सर्व पथदिव्यांवरील पथदिव्यांच्या वीजबिलापोटी असलेल्या थकबाकीचा भरणा येत्या दोन दिवसात करून त्याचा अहवाल व वीज देयके येत्या २३ मार्च रोजी होणाऱ्या बैठकीत सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. थकबाकीचा भरणा न झाल्याने महावितरणने वीजपुरवठा खंडित केल्यास त्याची संपूर्ण जवाबदारी संबंधित ग्रामपंचायतीच्या सचिवांची राहील, असेही या पत्रात स्पष्ट केले आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतmahavitaranमहावितरण