शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

अंगालाच गुंडाळल्या दारूच्या ३७ बॉटल्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 00:24 IST

दारुबंदी असलेल्या चंद्रपूूर आणि वर्धा जिल्ह्यात दररोज मोठ्या प्रमाणात परराज्यातून दारूची तस्करी होत आहे. त्यासाठी आरोपी वेगवेगळ्या शक्कल लढवीत आहेत.

ठळक मुद्देतस्करीची अनोखी शक्कल : तरीही सुटला नाही आरपीएफच्या नजरेतून

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दारुबंदी असलेल्या चंद्रपूूर आणि वर्धा जिल्ह्यात दररोज मोठ्या प्रमाणात परराज्यातून दारूची तस्करी होत आहे. त्यासाठी आरोपी वेगवेगळ्या शक्कल लढवीत आहेत. शनिवारी आरपीएफच्या नजरेतून वाचण्यासाठी एका आरोपीने चक्क शरीरालाच दारूच्या ३७ बॉटल्स गुंडाळून प्रवासाचा बेत आखला. परंतु नागपुरात गाडी येताच आरपीएफच्या जवानांनी त्यास शोधून ताब्यात घेतले.भय्या साठे (५२) रा. सिद्धार्थनगर, बल्लारशा, जि. चंद्रपूर असे आरोपीचे नाव आहे. तो रेल्वेगाडी क्रमांक १२६८८ डेहराडूून-मदुराई एक्स्प्रेसच्या मागील जनरल कोचमधून प्रवास करीत होता. ही गाडी दुपारी १२ वाजता प्लॅटफार्म क्रमांक २ वर येताच आरपीएफचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कृष्णा नंद राय, विकास शर्मा, उषा तिग्गा यांनी त्याची तपासणी केली असता त्याने शरीरालाच दारूच्या बॉटल्स सेलोटेपच्या साह्याने गुंडाळल्याचे लक्षात आले. लगेच त्यास अटक करून आरपीएफ ठाण्यात आणण्यात आले. चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यात दारूची तस्करी करण्यासाठी आरोपी नानाविध शक्कल लढवीत असून यापूर्वीही तस्करांनी कपड्याचे बॉक्स, प्रसाधनगृह, महिलांचा वापर करणे, मिठाई बॉक्स, महाविद्यालयीन तरुणी आदींच्या माध्यमातून दारूची तस्करी केल्याचे उघड झाले आहे. वर्षभरात अशा पद्धतीने तस्करी करण्यात येणाºया लाखो बॉटल्स आरपीएफने पकडल्या आहेत.