शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

३६ प्रकरणात फरार असलेल्या गुन्हेगारास फिल्मी स्टाईलने पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 23:05 IST

बलात्कार, घरफोडी आणि अवैध शस्त्र ठेवणे आदी ३६ प्रकारच्या गंभीर प्रकरणात फरार असलेल्या गुन्हेगारास शांतिनगर पोलिसांनी फिल्मी स्टाईलने अटक केली. अजय ऊर्फ अज्जू शिवदयाल यादव (३४) रा. कोतवाली सिवनी मध्य प्रदेश असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र व मध्य प्रदेशात अनेक गुन्हे दाखल आहेत. तब्बल ३६ प्रकरणात तो फरार आहे. पोलिसांनी त्याच्याजवळून ३ लाख ६४ हजार रुपयाचा माल जप्त केला.

ठळक मुद्देबलात्कार, घरफोडी आदी गुन्हे दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बलात्कार, घरफोडी आणि अवैध शस्त्र ठेवणे आदी ३६ प्रकारच्या गंभीर प्रकरणात फरार असलेल्या गुन्हेगारास शांतिनगर पोलिसांनी फिल्मी स्टाईलने अटक केली. अजय ऊर्फ अज्जू शिवदयाल यादव (३४) रा. कोतवाली सिवनी मध्य प्रदेश असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र व मध्य प्रदेशात अनेक गुन्हे दाखल आहेत. तब्बल ३६ प्रकरणात तो फरार आहे. पोलिसांनी त्याच्याजवळून ३ लाख ६४ हजार रुपयाचा माल जप्त केला.सहायक पोलीस आयुक्त वालचंद्र मुंढे यांनी पत्रपरिषदेत याबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, शांतिनगर पोलीस ठाणे हद्दीतील तेलीपुरा येथील रहिवासी डॉ. राजेश लक्ष्मीचंद्र जैन हे काही दिवसांपूर्वी भाचीच्या साक्षगंधासाठी कुटुंबासह जबलपूरला गेले होते. त्यादरम्यान त्यांच्या घरी चोरी झाली. चोरांनी २ लाख २३ हजार १०० रुपयाचे दागिने चोरून नेले. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.बी. उईके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार घनश्याम तिवारी, अश्विन बोरकर, प्रकाश पखान, वसीम, विवेक कवाडकर यांनी या प्रकरणाचा तपास केला. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजच्या मदतीने आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा शोध लागत नव्हता. तेव्हा पोलिसांनी वेश बदलून दिवस रात्र नजर ठेवली. गुरुवारी आरोपी सापडला. पोलिसांनी त्याला आवाज दिला. तेव्हा तो पळू लागला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून अटक केली. त्याने जैन यांच्या घरी चोरी केल्याची कबुली दिली. यासोबतच त्याने अनेक गुन्हे केल्याचेही कबूल केले. मध्य प्रदेशमध्येही त्याच्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत. मध्य प्रदेश पोलिसांनी त्याला तडीपार करण्याची कारवाई केली होती. त्यामुळे तो नागपूरला पळून आला होता. तेव्हापासून तो नागपुरातच घरफोडी व चोरी करू लागला.

टॅग्स :theftचोरीArrestअटक