शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! नागपुरातील ३५९ शाळांमध्ये क्रीडांगण नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 10:11 IST

नागपूर शहरातील शे-दीडशे नाही तर, तब्बल ३५९ शाळांमध्ये क्रीडांगण नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

ठळक मुद्देहायकोर्टात माहिती माध्यमिक शाळा संहितेनुसार सुविधा असणे अनिवार्य

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील शे-दीडशे नाही तर, तब्बल ३५९ शाळांमध्ये क्रीडांगण नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. ही माहिती खुद्द जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्रावर सादर केली आहे. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रातील अव्यवस्थेचा भंडाफोड झाला आहे.न्यायालयाने सर्व पक्षांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर यासंदर्भात योग्य माहिती सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, क्रीडांगण नसताना या शाळा विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षण कसे देतात व शाळांनी याकरिता काही पर्यायी व्यवस्था केली आहे काय, यावरही स्पष्टीकरण मागितले आहे. न्यायालयाने या प्रकरणावर आता ११ जुलै रोजी पुढील सुनावणी निश्चित केली असून, त्यावेळी पक्षकारांना न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार स्पष्टीकरण सादर करावे लागणार आहे. प्रकरणातील न्यायालय मित्र अ‍ॅड. अनिरुद्ध अनंतकृष्णन यांनी न्यायालयात केलेल्या युक्तिवादानुसार माध्यमिक शाळा संहिता व अन्य कायदेशीर तरतुदीनुसार विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षण देणे अनिवार्य आहे. शारीरिक शिक्षण क्रीडांगण असल्याशिवाय दिल्या जाऊ शकत नाही. त्यामुळे शाळांनी तरतुदींचे पालन करणे आवश्यक आहे. राज्य सरकारनेही शाळांच्या बेजबाबदारपणावर आश्चर्य व्यक्त करून या शाळांकडे सुरुवातीपासूनच क्रीडांगण नसावीत, असा दावा केला. यासंदर्भात न्यायालयाने स्वत:च जनहित याचिका दाखल केली आहे.

- तर सार्वजनिक मैदानांवर टाचस्वत:चे क्रीडांगण नसणाऱ्या शाळांनी विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षण देण्याकरिता कोणतीच पर्यायी व्यवस्था केली नसल्याचे आढळून आल्यास सार्वजनिक मैदानांवर टाच येऊ शकते. न्यायालयाने यासंदर्भात सरकार व स्थानिक प्राधिकरणांना तंबी दिली आहे. विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षण देण्यासाठी शाळांमध्ये काहीच सुविधा नसल्यास सरकार व इतर प्रतिवादींना सार्वजनिक मैदानांवरील भूखंड नियमित करण्यापासून का थांबविण्यात येऊ नये व या मैदानांचा विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षण देण्यासाठी उपयोग करण्याचा आदेश का देण्यात येऊ नये, अशी विचारणा न्यायालयाने केली आहे. यावरही सरकार व इतर प्रतिवादींना पुढच्या तारखेला न्यायालयात स्पष्टीकरण सादर करावे लागणार आहे.

टॅग्स :Schoolशाळा