शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
3
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
4
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
5
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
6
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
7
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
8
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
9
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
10
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
11
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
12
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
13
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
14
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
15
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
16
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
17
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
18
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
19
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
20
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात मिहानमध्ये ३५ हजारांहून थेट रोजगार : नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 01:32 IST

देशात रोजगारनिर्मिती होत नसल्याचा आरोप विरोधकांकडून होत असताना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी  यांनी नागपुरात निर्माण झालेल्या रोजगाराची आकडेवारीच सादर केली. मागील चार वर्षांत ‘मिहान’, ‘मेट्रो’, ‘एमआयडीसी’मध्ये साडेतेरा हजारांहून थेट तर ७५ हजारांहून अधिक अप्रत्यक्ष रोजगारांची निर्मिती झाली. येत्या वर्षभरात ‘मिहान’मध्ये मोठ्या कंपन्यांचे विस्तारीकरण पूर्ण झाल्यानंतर ३५ हजारांहून अधिक थेट रोजगार निर्माण होतील, अशी माहिती त्यांनी दिली.

ठळक मुद्देशहरातील मैदानांचे स्वरूप बदलणार, ‘मल्टिमॉडेल हब’चे काम लवकरच सुरू होणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशात रोजगारनिर्मिती होत नसल्याचा आरोप विरोधकांकडून होत असताना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी  यांनी नागपुरात निर्माण झालेल्या रोजगाराची आकडेवारीच सादर केली. मागील चार वर्षांत ‘मिहान’, ‘मेट्रो’, ‘एमआयडीसी’मध्ये साडेतेरा हजारांहून थेट तर ७५ हजारांहून अधिक अप्रत्यक्ष रोजगारांची निर्मिती झाली. येत्या वर्षभरात ‘मिहान’मध्ये मोठ्या कंपन्यांचे विस्तारीकरण पूर्ण झाल्यानंतर ३५ हजारांहून अधिक थेट रोजगार निर्माण होतील, अशी माहिती त्यांनी दिली. गेल्या चार वर्षांत केंद्र सरकारने केलेल्या कामाचा लेखाजोखा गडकरी यांनी प्रसार माध्यमांसमोर सादर केला. यावेळी त्यांनी उपराजधानीतील विकास कार्य व भविष्यातील संकल्पनांबाबतदेखील माहिती दिली.मागील चार वर्षांत ‘मिहान’मध्ये थेट ११ हजार १९८ तर ६४ हजार ९५२ लोकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळाला; तर ‘मेट्रो’मुळे ८१३ प्रत्यक्ष तर १० हजार ३०० अप्रत्यक्ष रोजगाराची निर्मिती झाली. ‘एमआयडीसी’मध्ये १ हजार ४१५ युवकांना थेट रोजगार मिळाला. ‘मिहान’मध्ये आणखी मोठ्या कंपन्या येत असून, वर्षभरात ३६ हजार ५१९ थेट तर ३ लाख ४२ हजार १४२ अप्रत्यक्ष रोजगाराची निर्मिती होईल, असा दावा गडकरी यांनी केला.नागपूर शहर विकासाची भरारी घेण्यासाठी सज्ज आहे. एकट्या नागपुरात सद्यस्थितीत त्यांच्या मंत्रालयाच्या माध्यमातून ५६ हजार कोटींची कामे सुरू आहेत. रस्ते, वीज, पाणी, दळणवळण सुविधांसोबतच जनप्रतिनिधीने आपल्या संपूर्ण भागाच्या विकासासाठी प्रयत्नरत असले पाहिजे. शहराची प्रतिमा सुधारण्यासाठी आम्ही खासदार महोत्सव व खेळ महोत्सवाचे आयोजन केले. भविष्यात शहरातील मैदानांचे स्वरूप बदलण्यात येईल, असे गडकरी यांनी यावेळी सांगितले. नागपुरात पंतप्रधान गृहनिर्माण योजनेंतर्गत स्वस्त दरातील ६ हजार ५०० घरे बनविण्याचे काम सुरू आहे. भविष्यात आणखी १० हजार घरे बनविण्यात येतील, अशी माहिती गडकरी यांनी दिली.उपराजधानीला अपघातमुक्त बनविणारयावेळी नितीन गडकरी यांनी उपराजधानीला अपघातमुक्त करणार असल्याचा दावा केला. शहरातील अपघातप्रवण जागांची माहिती एकत्रित करण्याचे निर्देश मनपा व एनआयटीला दिले असून, त्यानुसार भविष्यात अपघात थांबविण्यासाठी उपाययोजना करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.‘मल्टीमॉडेल हब’ची निविदा प्रक्रिया दीड महिन्यातअजनीत प्रस्तावित असलेल्या मल्टीमॉडेल ट्रान्सपोर्ट हबचा ‘डीपीआर’ तयार झाला असून काही महिन्यात याचे काम सुरू होईल, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली. यासाठी एक विशेष समिती गठित करण्यात आली असून याची अध्यक्षता विभागीय आयुक्त अनुप कुमार करीत आहेत. हा ‘डीपीआर’ ‘एनएचएआय’तर्फे बनविण्यात आला असून यात रेल्वेच्या अखत्यारित असलेली ७५ हेक्टर जागादेखील आहे. या प्रकल्पात रेल्वेच्या अखत्यारित असलेल्या आस्थापना व इतर बाबीच्या पुनर्वसनाबाबत रेल्वेने प्रश्न उपस्थित केले आहेत. याबाबत अमेरिकेतील कन्सल्टन्ट कंपनीला निर्देशित करण्यात आले असून या संपूर्ण भागाचे सर्वेक्षण करण्यात येणार आहेत. सर्व विभागांच्या संतुष्टीनंतर ‘डीपीआर’ला मंजुरीसाठी मनपाकडे पाठविण्यात येईल व दीड महिन्यात निविदा प्रक्रिया सुरू होईल, असे अनुपकुमार यांनी सांगितले.

 

टॅग्स :Nitin Gadakriनितिन गडकरीMihanमिहान