शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

राज्यात ३२ हजार मुले शाळाबाह्य : राज्य सरकारची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 00:54 IST

राज्यामध्ये ६ ते १४ वर्षे वयोगटातील ३२ हजार ११ शाळाबाह्य मुले आढळून आली असून त्यापैकी ३ हजार ३७९ मुले कधीच शाळेत गेली नाहीत तर, २८ हजार ६३२ मुले शाळेत सतत गैरहजर राहतात. राज्य सरकारच्या उत्तरातून ही धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

ठळक मुद्दे३३७९ मुले कधीच शाळेत गेली नाहीत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यामध्ये ६ ते १४ वर्षे वयोगटातील ३२ हजार ११ शाळाबाह्य मुले आढळून आली असून त्यापैकी ३ हजार ३७९ मुले कधीच शाळेत गेली नाहीत तर, २८ हजार ६३२ मुले शाळेत सतत गैरहजर राहतात. राज्य सरकारच्या उत्तरातून ही धक्कादायक माहिती पुढे आली आहे.मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये यासंदर्भातील जनहित याचिकेचे कामकाज पाहणारे अ‍ॅड. फिरदोस मिर्झा यांच्या पत्राला पाठविलेल्या उत्तरात ही माहिती आहे. याशिवाय सरकारने, शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण व त्यांची आकडेवारी गोळा करण्यासाठी क्षेत्रनिहाय प्राधिकारी नियुक्त केल्याचे सांगितले आहे. त्यानुसार, महानगरपालिका क्षेत्राकरिता शिक्षणाधिकारी, नगर परिषद क्षेत्राकरिता प्रशासकीय अधिकारी तर, जिल्हा परिषद क्षेत्राकरिता प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यावर सर्वेक्षणाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यासंदर्भात अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे.देशात २०१० मध्ये शिक्षण हक्क कायदा लागू झाला. त्यानुसार राज्य शासनाने २०११ मध्ये नियम लागू केले. परंतु, नियमांचे काटेकोर पालन केले जात नाही. त्यामुळे राज्यात आजही मोठ्या संख्येत शाळाबाह्य मुले आहेत. यासंदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. त्यामध्ये न्यायालयाने शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणासाठी विशेष अधिकारी नियुक्त करण्याचे निर्देश दिले होते. विशेष अधिकारी अधिसूचित झाल्यानंतर शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात यावे व सर्वेक्षणाचा अहवाल आल्यानंतर केंद्रीय व राज्य बाल हक्क संरक्षण आयोग यांच्याशी सल्लामसलत करून शाळाबाह्य मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी धोरण तयार करावे असे आदेशही न्यायालयाने दिले होते व ती याचिका निकाली काढली होती. दरम्यान, अ‍ॅड. मिर्झा यांनी राज्य सरकारला पत्र लिहून न्यायालयाच्या आदेशांवर झालेल्या अंमलबजावणीची माहिती मागितली होती. त्यांना सरकारने उत्तर दिले आहे.जिल्हानिहाय शाळाबाह्य मुलेअहमदनगर - ५२१अकोला - ६८९अमरावती - ३२६औरंगाबाद - ४६४बिड - २५०५भंडारा - ४५बुलडाणा - ४४२चंद्रपूर - १५६धुळे - १८१७गडचिरोली - ५१गोंदिया - ११४हिंगोली - ७८४जळगाव - १८६४जालना - ७६८कोल्हापूर - १०३लातुर - ३२९मुंबई उपनगर - ३८३बृहंमुंबई - ३५५८नागपूर - ३६नांदेड - १६७नंदुरबार - २७५४नाशिक - २३०३उस्मानाबाद - १६२परभणी - ४४१पालघर - २५००पुणे - २३५९रायगड - ४५३रत्नागिरी - १०७सांगली - १३९सातारा - १५७सिंधुदुर्ग - १२९सोलापूर - ३१४ठाणे - ४५४३वर्धा - ४३वाशीम - ७५यवतमाळ - ४१०

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयEducationशिक्षण