शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

३२ वर्षे होऊनही सावित्रींच्या लेकींना मिळतो १ रुपयाच उपस्थिती भत्ता! पुरोगामी महाराष्ट्रात अशीही थट्टा

By गणेश हुड | Updated: December 7, 2023 17:02 IST

विद्यार्थीनींना उपस्थित  दिवसाकरिता प्रतिदिन १ रूपया  दैनिक भत्ता देण्याबाबतचा निर्णय राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने १० जानेवारी १९९२ रोजी घेतला होता. मागील ३२ वर्षात यात छदामही वाढविलेला नाही.

नागपूर : मुलींची शाळेतील उपस्थिती  वाढावी यासाठी ३२ वर्षापूर्वी राज्य शासनाच्या शिक्षण  विभागाने  शाळेत उपस्थित विद्यार्थीनींना प्रतिदिन १ रुपया दैनिक भत्ता  सुरू केला होता. मात्र ३२ वर्षात भत्त्यात एक पैशाचीही वाढ झालेली नाही. मुलींना शिक्षण मिळावे, यासाठी महात्मा ज्योतिबा फुले  व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी चळवळ उभारली आणि मुलींना शिक्षणाचा हक्क मिळवून दिला. त्याच पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात राज्याच्या शिक्षण विभागाकडून सावित्रीच्या लेकींची  ही एक प्रकारे थट्टाच आहे.

राज्यात आर्थिक दुर्बल घटक, आदिवासी क्षेत्राबाहेरील अनुसूचित जाती जमाती, भटक्या जमाती अशा प्रवर्गातील  दारिद्रय रेषेखालील कुटूंबातील सावित्रीच्या लेकींना नियमित शाळेत येण्याची आवड निर्माण व्हावी, त्यांची गळती थांबावी यासाठी तीन दशकांपासून राज्य सरकारतर्फे प्रतिदिन एक रुपया प्रोत्साहन भत्ता दिला जातो. इयत्ता १ली ते ४ थी च्या विद्यार्थीनींची  शाळेतील उपस्थिती ७५ टक्केपेक्षा अधिक असेल अशा विद्यार्थीनींना उपस्थित  दिवसाकरिता प्रतिदिन १ रूपया  दैनिक भत्ता देण्याबाबतचा निर्णय राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने १० जानेवारी १९९२ रोजी घेतला होता. मागील ३२ वर्षात यात छदामही वाढविलेला नाही.

मिळतात २२०  रुपये अन् बचत खात्यासाठी लागतात १००० रुपये

या योजनेअंतर्गत फार तर या विद्यार्थीनींना वर्षाला २०० ते २२०  रूपये मिळतात. परंतू विद्यार्थ्यांना कोणताही आर्थिक लाभ डीबीटी अंतर्गत देणे बंधनकारक असताना त्यांना राष्ट्रीयकृत बँकेत १ हजाररूपये गुंतवून बचत खाते काढणे अनिवार्य आहे. म्हणजे ४ वर्षात मिळणारा भत्ता फक्त बँकेचे बचत खाते उघडण्यातच खर्च होतो. त्यात या खात्यावर नियमित व्यवहार होत नसल्याने बँकेकडून शुल्ककपात करतात. ही तर शासनाची संवेदनशुन्यता.

३२  वर्षात महागाई वाढली. त्याप्रमाणात अधिकारी  कर्मचारी व लोकप्रतिधींच्या वेतन व भत्त्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली , परंतू ३२ वर्षात गरिब विद्यार्थीनींच्या भत्त्यात एका छदामाची वाढ केली नाही. ही  विद्यार्थीनींची थट्टाच म्हणावी लागेल. शासनाने या भत्त्यात वाढ करून प्रतिदिन २० रुपये एवढा भत्ता लागू करावा, असं जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती नागपूरचे लीलाधर ठाकरे म्हणाले. 

टॅग्स :nagpurनागपूर