बैठकीत आढावा : चालता-फिरता दवाखाना सुरू करणारनागपूर : महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्वाईन फ्लूला आळा घालण्यासाठी उपाययोजना हाती घेतल्या आहेत. शहरात सर्वे सुरू केला आहे. २६१८ घरांच्या तपासणीत स्वाईन फ्लूचे ३२ रुग्ण आढळून आले आहेत. या रोगाला आळा घालण्यासाठी उपाययोजनांसोबतच दोन चालते-फिरते दवाखाने सुरू करण्याचे निर्देश बुधवारी आरोग्य समितीच्या बैठकीत देण्यात आले. यात लवकरच वाढ केली जाणार असल्याची माहिती समितीचे सभापती रमेश सिंगारे यांनी दिली. बैठकीला सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी, सुनील अग्रवाल, उपायुक्त संजय काकडे, आरोग्य उपसंचालक डॉ. मिलिंद गणवीर, नोडल अधिकारी डॉ. श्याम शेंडे, स्वाईन फ्लू समन्वयक सुधीर फटिंग आदी उपस्थित होते. मागील काही दिवसांत शहरात आढळून आलेल्या ३२ पैकी ७ रुग्णांचा मृत्यू झाला. इतरांवर उपचार सुरू आहेत. या आजाराला आळा घालण्यासाठी उपचारासोबतच जनजागृतीची गरज आहे. यासाठी शहरात ठिकठिकाणी होर्डिंग लावणे, मालमत्ता करासोबतच स्वाईन फ्लूबाबत जनजागृती करण्याचे निर्देश देण्यात आले. शासन निर्देशानुसार रुग्णाच्या घरी व परिसरात सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ज्या खासगी रुग्णालयात आयसीसीयू व स्वाईन फ्लूवर उपचारासाठी सुविधा उपलब्ध होऊ शकतात, अशा रग्णालयात स्वाईन फ्लू रुग्णावर उपचार करण्यासाठी मनपाच्या अनुमतीची गरज भासणार नाही. स्वाईन फ्लूचा रुग्ण आढळून आलेल्या भागात हा आजार पसरू नये, यासाठी परिसराचा तातडीने सर्वे करू न उपाययोजना करण्याची सूचना दयाशंकर तिवारी यांनी केली. (प्रतिनिधी)नियंत्रण कक्षस्वाईन फ्लू रुग्णांवर तातडीने उपचार व्हावेत यासाठी मनपा मुख्यालयात नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षाशी संपर्क करताच मदत केली जाणार आहे.
स्वाईन फ्लूूचे ३२ रुग्ण
By admin | Updated: February 5, 2015 01:10 IST