शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : "४ जूननंतर गुड बाय भाजपा, गुड बाय मोदी, टाटा"; राहुल गांधींची निकालाआधीच भविष्यवाणी
2
“तुमच्या याचिकेवर CJI निर्णय घेतील”; केजरीवाल यांच्या याचिकेवर तत्काळ सुनावणीस SCचा नकार
3
पोर्शे कार अपघात: 2 तासांत 15 कॉल...; बाळाच्या वडिलांनी सॅम्पल बदलण्यासाठी डॉक्टरांवर असा टाकला दबाव 
4
वाढदिवस ठरला अखेरचाच; तासगावजवळ कार कालव्यात पडून एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू
5
“४०० पार दावा विसरा, २०० जागांपुढे जात नाही, PM मोदींनी कामाचा विचार करावा”; खरगेंची टीका
6
Paytm ला अदानींचा 'आधार' मिळणार का? अहमदाबादमध्ये विजय शर्मांसोबत भेट... डील बाबत 'ही' अपडेट
7
Rajnath Singh : "केजरीवालांनी आपल्या गुरुचं ऐकलं नाही, अण्णा हजारेंनी..."; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
8
खळबळजनक! पत्नीसह कुटुंबातील 8 जणांची कुऱ्हाडीने केली हत्या, नंतर उचललं टोकाचं पाऊल
9
"मी शाहरुखच्या धर्माचा आदर करते, पण याचा अर्थ...", गौरी खानचे 'ते' विधान पुन्हा चर्चेत!
10
Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरण; Paytm च्या शेअर्समध्ये तेजी, आयनॉक्स विंड घसरला
11
Raghuram Rajan यांना राजकारणात येण्यापासून कोणी रोखलं? खुद्द माजी RBI गव्हर्नरांनी केला खुलासा
12
आजचे राशीभविष्य - 29 मे 2024; कुटुंबीयांशी संघर्ष होण्याची शक्यता, रागावर नियंत्रण ठेवा
13
"मला गायब होण्यासाठी भाग पाडलं गेलं", सोढीची प्रतिक्रिया; लवकरच खुलासा करणार
14
Success Story: रोल्स रॉयस ते हेलिकॉप्टरचे मालक, शेतकऱ्याच्या मुलानं शून्यातून उभं केलं जग
15
‘अशी’ करा स्वामी समर्थ महाराजांची मानस पूजा; होईल अपार कृपा, अशक्यही शक्य करतील स्वामी!
16
अग्रलेख: महायुतीत ठिणगी! भाजप आणि अजित पवार गटाची युती केवळ नेत्यांच्या पातळीवर
17
१२ वर्षांनी गजलक्ष्मी राजयोग: ८ राशींवर लक्ष्मीकृपा, उत्पन्न वाढ; नवी नोकरीची संधी, शुभ होईल
18
डोंबिवली स्फोट, घाटकोपर होर्डिंग, राजकोट आग.. ­नाहक जीव जातात; जबाबदार कोण?- प्रशासन!
19
अन्वयार्थ विशेष लेख: काश्मीरचे स्वर्गीय सौंदर्य आणि विकासाचा ‘तोल’
20
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत

नागपूर जिल्ह्यातील ३१.६६ टक्के पेरण्या आटोपल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2019 10:21 AM

जिल्ह्यात शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली असून, आठवडाभरात ३१.६६ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्याची आकडेवारी कृषी विभागाने सादर केली आहे.

ठळक मुद्देकापसाची पेरणी सर्वाधिकधानाच्या रोवणीला अद्यापही पावसाची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संपूर्ण जून महिना कोरडा गेल्यामुळे जिल्ह्यातील पेरण्या खोळबंल्या होत्या. जुलै महिना लागताच पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. पण अद्यापही पाऊस सरासरीपेक्षा ११ टक्के कमी पडला असला तरी, जिल्ह्यात शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली असून, आठवडाभरात ३१.६६ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्याची आकडेवारी कृषी विभागाने सादर केली आहे.जिल्ह्यात खरिपाचे नियोजन ५ लाख ७ हजार ६०० हेक्टरवर करण्यात आले आहे. यंदा जिल्ह्यात सर्वाधिक कापसाचे नियोजित क्षेत्र २ लाख २५ हजार हेक्टर आहे. तर सोयाबिनचे १ लाख हेक्टर व भाताचे ९४ हजार २०० हेक्टर इतके असे क्षेत्र आहे. यंदा पावसाचे आगमन उशिरा झाले. मागीलवर्षी काही शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली होती. यातून धडा घेत शेतकºयांनी यंदा सावध भूमिका घेतली.पावसाचा अंदाज घेऊनच शेतकºयांनी पेरण्या केल्याने दुबार पेरणीची शक्यता कमी असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. ४ जुलैपर्यंत जिल्ह्यात सरासरी साधारणत: २२४.९१ मि.मी. मीटर पाऊस पडत असतो. मात्र, यंदा १ जून ते ४ जुलैपर्यंत केवळ २००.२९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तो सरासरीपेक्षा ११ टक्क्यांनी कमी आहे.

पीकनिहाय पेरण्याआजवर जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या ३१.६६ टक्के म्हणजेच १ लाख ५१ हजार ५६७ हेक्टरवर खरीपाच्या पेरण्या झाल्या आहेत. कापसाची १ लाख ९ हजार ४७२ हेक्टरवर पेरणी झाली आहे. तर सोयाबीन २३ हजार ६५३ हेक्टर, भुईमूग ५७ हेक्टरवर, तूर १७ हजार ८६४ हेक्टर, मूग २६ हेक्टर, उडीद ३० हेक्टर, ज्वारी १७६ हेक्टर आणि मक्याची पेरणी ३१४ हेक्टरवर झाली आहे. पाऊस सातत्याने बरसल्यास उर्वरित पेरण्या येत्या काही दिवसांत पूर्ण होतील, असा दावा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे

धानाची रोवणी पंधरवड्यानंतरजिल्ह्यात यंदा धानाचे ९४ हजार २०० हेक्टर एवढे नियोजित क्षेत्र आहे. जिल्ह्यातील मौदा, रामटेक, पारशिवनी, कामठी, कुही, उमरेड व भिवापूर या तालुक्यांमध्ये भाताची रोवणी केली जाते. मात्र, सध्या धानाची रोवणी करण्यायोग्य पाऊस झाला नसल्याने शेतकरी शेतात पºहे टाकण्याचे काम करीत आहे. त्यामुळे भात रोवणी ही पुढील पंधरवड्यानंतरच जिल्ह्यात सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :agricultureशेती