शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्रलेख: महायुतीत ठिणगी! भाजप आणि अजित पवार गटाची युती केवळ नेत्यांच्या पातळीवर
2
आजचे राशीभविष्य - 29 मे 2024; कुटुंबीयांशी संघर्ष होण्याची शक्यता, रागावर नियंत्रण ठेवा
3
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी घणसोली येथे ३९४ मीटर लांबीचा बोगदा पूर्ण
4
डोंबिवली स्फोट, घाटकोपर होर्डिंग, राजकोट आग.. ­नाहक जीव जातात; जबाबदार कोण?- प्रशासन!
5
अन्वयार्थ विशेष लेख: काश्मीरचे स्वर्गीय सौंदर्य आणि विकासाचा ‘तोल’
6
१० जूनपर्यंत कोस्टल रोडची दुसरी बाजू खुली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
7
LIC चा केंद्राला ३,६६२ कोटींचा लाभांश; RBI देखील सरकारला देणार २.११ लाख कोटी
8
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत
9
रुग्णालयातील अधीक्षक पद वैद्यकीय शिक्षण विभाग भरणार; अधिष्ठाताच्या अधिकारांवर गदा
10
राजधानी दिल्ली होरपळली! पारा विक्रमी ४९.९ अंशांवर; राजस्थान, हरयाणात तापमान ५०च्या पुढे
11
डोंबिवलीतील धोकादायक उद्योगांचे पाताळगंगा, अंबरनाथला स्थलांतर: उद्योगमंत्री उदय सामंत
12
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
13
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
14
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
15
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
16
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
17
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
18
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
19
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर

नागपूर शहरातील ३,४६,११९ ग्राहकांवर ३०९ कोटीचे वीज बील थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2020 11:08 AM

electricity bill Nagpur News नागपूर शहरातील जवळपास एकतृतीयांश वीज ग्राहकांनी अनेक दिवसापासून वीज बिल भरलेलेच नाही.

ठळक मुद्देमंगळवारपासून महावितरणचे वसुली अभियानवीज पुरवठा खंडित होणार नाही

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शहरातील जवळपास एकतृतीयांश वीज ग्राहकांनी अनेक दिवसापासून वीज बिल भरलेलेच नाही. महावितरणनुसार ३ लाख ४६ हजार ११९ वीज ग्राहकांवर तब्बल ३०९.८४ कोटी रुपयाचे वीज बिल थकीत आहे. शहराचाच विचार केला तर शहरात एकूण नऊ लाख ग्राहक आहेत. आता मुख्यालयाच्या निर्देशानुसार मंगळवारपासून थकीत वसुली मोहीम सुरू करण्यात येत आहे. सध्या कोणत्याही ग्राहकाचे वीज कनेक्शन कापले जाणार नाही. वीज कर्मचारी थेट थकबाकीदार ग्राहकाशी संपर्क साधून त्यांना वीज बिल भरण्याची विनंती करतील.

लॉकडाऊनदरम्यान वीज मीटर रीडिंग बंद असल्याने बिल प्रक्रिया ठप्प होती, नंतर तीन ते चार महिन्याचे बिल एकाच वेळी पाठविण्यात आले. वीज बिलाबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी वाढल्या. अशा परिस्थितीत मोठ्या संख्येने लोकांनी बिल भरणेच बंद केले.

नागपूर शहराचा विचार केल्यास येथील २ लाख ९३ हजार ८३१ ग्राहकांनी २३१.७६ कोटी रुपयाचे बिल भरलेले नाही, तर राज्यभरात सहा हजार कोटी रुपयाचे वीज बिल थकीत आहे. अशा परिस्थितीत महावितरणने मंगळवारपासून राज्यभरात थकीत बिल वसुली मोहीम सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत ग्राहकांशी थेट संपर्क साधून त्यांना बिल भरण्याची विनंती केली जाईल. सध्या कनेक्शन कापले जाणार नाही. परंतु थकीत रक्कम कमी न झाल्यास कनेक्शन कापण्याची मोहीमसुद्धा राबविली जाईल. याासाठी शाखा कार्यालय ते परिमंडळ कार्यालयापर्यंत पथक तैनात करण्यात आले आहे.

महालमध्ये सर्वाधिक थकबाकी

शहरात महाल, गांधीबाग, सिव्हिल लाईन्स व काँग्रेसनगर या चार डिव्हिजनच्या माध्यमातून वीजपुरवठा केला जातो. यापैकी काँग्रेसनगर सोडले तर तिन्ही डिव्हिजन वर्षभरापूर्वीपर्यंत फ्रेन्चाईसीच्या अधीन होते. या चारपैकी महाल डिव्हिजन थकबाकीमध्ये सर्वात पुढे आहे. येथील १ लाख ८ हजार ५५१ ग्राहकांवर ९३.३५ कोटी रुपयाचे वीज बिल थकीत आहे, तर काँग्रेसनगरमध्ये सर्वात कमी थकबाकीदार आहेत. येथे ७७,८६६ ग्राहकांवर ५८.३६ कोटी रुपयाचे बिल थकीत आहे.

 

टॅग्स :electricityवीज