शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर आयटीआयमधील ९६० जागांसाठी ३ हजारावर अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 10:42 IST

नागपूर आयटीआयमध्ये २५ ट्रेडमध्ये ९६० जागा असून, अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत ३००४ विद्यार्थ्यांनी अर्ज केले.

ठळक मुद्देआयटीआयकडे वाढला कल ९ जुलैला लागणार पहिली मेरिट लिस्ट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) ची प्रवेश प्रक्रिया १ जूनपासून सुरू झाली. नागपूर आयटीआयमध्ये २५ ट्रेडमध्ये ९६० जागा असून, अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत ३००४ विद्यार्थ्यांनी अर्ज केले. गेल्या काही वर्षात आयटीआयकडे कल वाढल्याने आयटीआयमध्ये ८० ते ८५ टक्के गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांची पसंती मिळत असल्याचे प्राचार्य हेमंत आवारे यांनी सांगितले.नागपूरच्या शासकीय आयटीआयमध्ये दहावी पास विद्यार्थ्यांसाठी एक व दोन वर्ष मुदतीचे २५ ट्रेड आहे. गेल्या काही वर्षात आयटीआय अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. त्यामुळे दरवर्षी सर्वच ट्रेडला १०० टक्के प्रवेश असतात. आयटीआयची संपूर्ण प्रक्रिया व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या माध्यमातून आॅनलाईन राबविण्यात येते. यावर्षी आॅनलाईन अर्ज करण्याची अंतिम तिथी ३० जून होती. ४ जुलैला पहिल्या फेरीची गुणवत्ता यादी लागणार आहे. त्यावर ५ जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना आक्षेप घ्यायचे आहे. ९ जुलैला पहिल्या फेरीची अंतिम मेरिट लिस्ट लागणार आहे. ११ ते १५ जुलै दरम्यान पहिल्या फेरीतील विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करायचे आहे. त्यानंतर १९ ते २४ जुलै दरम्यान दुसऱ्या फेरीची प्रक्रिया पार पडणार आहे. १० ऑगस्टपर्यंत प्रवेश प्रक्रिया सुरू राहणार आहे.जे विद्यार्थी १ ते ३० जून दरम्यान अर्ज करू शकले नाही. त्यांच्यासाठी २२ जुलै ते १० ऑगस्ट दरम्यान अर्ज करण्याची संधी आहे. १३ ऑगस्टला रिक्त जागांची यादी लागणार आहे. त्यानंतर १६ ऑगस्टपासून स्पॉट अ‍ॅडमिशनची प्रक्रिया पार पडणार आहे.

या ट्रेडकडे विशेष कलइलेक्ट्रीशियन, फिटर, टर्नर, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, मशिनिस्ट, पेंटर, सव्र्ेिअर, डिझेल मेकॅनिक, प्लंबर, स्टेनो इंग्लिश, मराठी या ट्रेडला विद्यार्थ्यांचा जास्त कल आहे. नागपूरचा आयटीआय राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या ओढा शासकीय आयटीआयकडे आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र