शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटदारांचे ३०० कोटी अडकले : मनपाच्या आर्थिक स्थितीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 20:49 IST

बिकट आर्थिक परिस्थितीमुळे शहरातील विकासकामे रखडली असताना आता महापालिकेतील कंत्राटदारांनी ३०० कोटींची थकीत देणी अदा करण्यासाठी मनपाकडे तगादा लावला आहे. प्रलंबित असलेली बिले न मिळाल्यास सध्या सुरू असलेली कामे बंद ठेवण्याचा इशारा कंत्राटदारांनी दिला आहे.

ठळक मुद्दे काम बंद ठेवण्याचा दिला इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बिकट आर्थिक परिस्थितीमुळे शहरातील विकासकामे रखडली असताना आता महापालिकेतील कंत्राटदारांनी ३०० कोटींची थकीत देणी अदा करण्यासाठी मनपाकडे तगादा लावला आहे. प्रलंबित असलेली बिले न मिळाल्यास सध्या सुरू असलेली कामे बंद ठेवण्याचा इशारा कंत्राटदारांनी दिला आहे.कंत्राटदारांच्या संघटनेने थकीत बिल अदा करण्यासंदर्भात स्थायी समिती अध्यक्ष विजय झलके व आयुक्तांनाही निवेदन दिले आहे. यात निधीअभावी कामे सुरू ठेवणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. थकीत बिलांची रक्कम मिळावी अशी मागणी कंत्राटदारांकडून मागील आठ महिन्यांपासून सुरू आहे. मात्र, प्रशासनाकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे आता आंदोलनाशिवाय पर्याय नसल्याचे संघटनेचे अध्यक्ष विजय नायडू यांनी सांगितले.कंत्राटदार बाजारातून उधारीवर साहित्य खरेदी करतो. मजुरांना मजुरी देण्यासाठी कर्ज घेतो. बिल मिळाल्यानंतर उधारी व कर्जाची परतफेड करतो. मात्र मागील काही महिन्यापासून थकीत बिल मिळालेले नाही. मजुरांना देण्यासाठी पैसे नसल्याने काम सुरू ठेवणे कठिण झाले आहे. बाजारात मनपाच्या कंत्राटदारांची पत नसल्याने उधारीवर माल मिळत नाही. त्यामुळे काम सुरू ठेवणे कठीण झाले आहे.आंदोलनाशिवाय पर्याय नाहीकंत्राटदारांची २५० ते ३०० कोटींचे बिल थकीत आहे. वांरवार मागणी करूनही गेल्या अनेक महिन्यांपासून असे काहीच घडलेले नाही. थकबाकीमुळे सध्या कंत्राटदारांना कोणी साहित्य देण्यास तयार नाहीत. इतकेच नव्हे तर निधी अभावी बाजारपेठेतूनही साहित्य घेता येत नाही. कंत्राटदारांची स्थिती अत्यंत विदारक असून अनेक कंत्राटदारांच्या मानसिक स्थितीवर याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे थकीत देणी न मिळाल्यास मनपा मुख्यालयात आंदोलनाशिवाय पर्याय नसल्याचे विजय नायडू यांनी सांगितले.सिमेंट रोडच्या कंत्राटदारांना २८ कोटी दिलेसिमेंट रोडची कामे सुरू व्हावी, यासाठी सिमेंट रोडच्या कंत्राटदारांना २८ कोटी देण्यात आले. परंतु मनपा कंत्राटदारांची थकबाकी सिमेंट रोडच्या कामापूर्वीची आहे. असे असूनही थकबाकी मिळालेली नाही. थकबाकी देण्यातही भेदभाव केला जात असल्याचा आरोप कंत्राटदारांनी केला आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका