शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील मेयो, मेडिकलमध्ये ३०० वर ‘बेरियाट्रिक सर्जरी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 10:49 IST

आतापर्यंत नागपूर मेयो व मेडिकलमध्ये ३०० वर बेरियाट्रिक शस्त्रक्रिया करण्यात आल्या. ही संख्याही इतर शासकीय रुग्णालाच्या तुलनेत सर्वाधिक ठरली आहे.

ठळक मुद्देडॉ. राज गजभिये यांचा पुढाकारश्रीमंतच नव्हे तर गरिबांचीही लठ्ठपणातून सुटका

सुमेध वाघमारे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लठ्ठपणा म्हणजे ‘ओबेसिटी’ ही स्त्री-पुरुष, गरीब-श्रीमंत सर्वामध्ये आढळतो. भारत हा ओबेसिटी या लठ्ठपणाशी संबंधित आजारात जगात तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे आणि ओबेसिटी हा एक आजार आहे, हे लोकांना माहीतच नाही. परिणामी त्याकडे अनेक जण दुर्लक्ष करतात आणि मृत्यूला सामोरे जातात. याची दखल प्रसिद्ध शल्यचिकित्सक व सध्याचे मेडिकल शल्यक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. राज गजभिये यांनी घेऊन २०११ मध्ये मेयो रुग्णालयात पहिली बेरियाट्रिक शस्त्रक्रिया केली. राज्यातील नव्हे तर देशातील शासकीय रुग्णालयात केलेली ही पहिली शस्त्रक्रिया ठरली. त्यांच्या नेतृत्वात आतापर्यंत मेयो व मेडिकलमध्ये ३०० वर बेरियाट्रिक शस्त्रक्रिया करण्यात आल्या. ही संख्याही इतर शासकीय रुग्णालाच्या तुलनेत सर्वाधिक ठरली आहे.भारतात जंक फूड, अल्कोहोलचे वाढते प्रमाण व अयोग्य जीवनशैलीमुळे पाचपैकी एक पुरुष किंवा स्त्री लठ्ठपणाने ग्रस्त आहे. वजन जास्त असल्यामुळे मधुमेह, हृदयरोग, रक्तदाब, आर्थ्रायटिस, कर्करोग, अ‍ॅथरोस्केरासिस असे आजार होऊ शकतात. जागतिक आरोग्य संघटनेनुसार (डब्ल्यूएचओ) २.८ दशलक्ष प्रौढ व्यक्ती या फक्त लठ्ठपणाच्या कारणाने दरवर्षी मरण पावतात. ‘डब्ल्यूएचओ’नुसार ओबेसिटीमुळे ४४ टक्के लोक मधुमेहामुळे, २३ टक्के लोक हृदयरोगामुळे तर ७.४१ टक्के लोक कर्करोगाला बळी पडतात. मेयो, मेडिकल रोजच्या ओपीडीमध्ये साधारण पाच रुग्ण ओबेसिटीचे येतात. यातील एका रुग्णाला बेरियाट्रिक शस्त्रक्रियेची गरज पडते. याची दखल त्यावेळी मेयोच्या शल्यक्रियाविभागाचे प्रमुख डॉ. राज गजभिये यांनी घेऊन २०११ मध्ये पहिली बेरियाट्रिक शस्त्रक्रिया केली. गेल्या दोन वर्षांपासून डॉ. गजभिये मेडिकलच्या शल्यक्रिया विभागाचे प्रमुख आहेत. त्यांनी येथेही या शस्त्रक्रिया सुरू केल्या आहेत. मेयो व मेडिकलमध्ये आतापर्यंत त्यांनी २५० ते ३०० वर बेरियाट्रिक शस्त्रक्रिया केल्या आहेत.१८७ किलो वजनाच्या पुरुषावर यशस्वी शस्त्रक्रियामेडिकलमध्ये शेकडो बेरियाट्रिक सर्जरी झाल्या असल्यातरी यात सर्वाधिक वजनाच्या म्हणजे १८७ किलो वजनाच्या पुरुषावर झालेली यशस्वी बेरियाट्रिक सर्जरी महत्त्वाची ठरली. आज या पुरुषाचे वजन ८२ किलो झाले असून या शस्त्रक्रियेमुळे तब्बल १०५ किलो वजन कमी झाले आहे. ते आता सामान्य जीवन जगत असल्याचे डॉ. गजभिये यांनी सांगितले.

मुख्यमंत्री साहाय्यता निधीची मदतमेडिकलमध्ये उपचार घेणाऱ्यांमध्ये गरीब रुग्णांची संख्या मोठी आहे. यात लठ्ठपणा असलेल्या रुग्णांची संख्या कमी असली तरी दिवसेंदिवस यात वाढ होत आहे. अशा रुग्णांमध्ये मधुमेह, हृदयरोग, रक्तदाब, आर्थ्रायटिस असल्याने मृत्यूचा धोका कमी करण्यासाठी बेरियाट्रिक सर्जरी हाच एकमेव उपचार ठरतो. परंतु खासगीमध्ये काही लाख रुपयांमध्ये ही शस्त्रक्रिया होते. यामुळे गरीब व सामान्य रुग्ण मोठ्या आशेने मेडिकलमध्ये येतात. यात मुख्यमंत्री सहायता निधीची मोठी मदत होत असल्याने याचा फायदा रुग्णांना होत आहे, असेही डॉ. गजभिये यांनी सांगितले.

डॉ. लकडवाला यांनी केली मेडिकलमध्ये शस्त्रक्रियाअकॅडमी आॅफ मेडिकल सायन्सेस, डायबेटिक असोसिएशन आॅफ इंडिया व असोसिएशन आॅफ सर्जन्सच्या वतीने नुकतेच बेरियाट्रिक सर्जरी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत प्रसिद्ध बेरियाट्रिक सर्जन डॉ. मुफ्फझल लकडावाला यांनी व डॉ. राज गजभिये यांनी मिळून मेडिकलमध्ये एका १५७ किलो वजनाच्या व १४२ किलो वजनाच्या रुग्णावर ही यशस्वी शस्त्रक्रिया केली. या दोन्ही शस्त्रक्रियेचे सभागृहात थेट प्रक्षेपण करून या दोन्ही तज्ज्ञानी उपस्थित शकेडो तज्ज्ञांना मार्गदर्शन केले. यामुळे मेडिकल केवळ बेरियाट्रिक शस्त्रक्रियेवरच भर देत नाही तर या क्षेत्रात तज्ज्ञ वाढविण्यावरही भर देत असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय