शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

३०रुपये रोजंदारीवर घर चालते का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 00:01 IST

राष्ट्रीय शालेय पोषण आहार (शापोआ) योजनेंतर्गत ‘शापोआ’ कर्मचाऱ्यांना दर महिन्याला केवळ हजार रुपये मानधन म्हणजे साधारण ३० रुपये रोज मिळतो. एवढ्या कमी पैशात घर चालते का, हा प्रश्न राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियनच्या महिलांनी उपस्थित करून मानधन वाढीला घेऊन मंगळवारी विधिमंडळावर मोर्चा काढून नारेबाजी करीत लक्ष वेधले.

ठळक मुद्देशालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचा प्रश्न : विधिमंडळावर रेटून धरल्या मागण्या

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रीय शालेय पोषण आहार (शापोआ) योजनेंतर्गत ‘शापोआ’ कर्मचाऱ्यांना दर महिन्याला केवळ हजार रुपये मानधन म्हणजे साधारण ३० रुपये रोज मिळतो. एवढ्या कमी पैशात घर चालते का, हा प्रश्न राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियनच्या महिलांनी उपस्थित करून मानधन वाढीला घेऊन मंगळवारी विधिमंडळावर मोर्चा काढून नारेबाजी करीत लक्ष वेधले.या मोर्चाचे नेतृत्व श्याम काळे, विनोद झोडगे, मुगाजी बुरुड, दिलीप उटाणे, बी.के. जाधव, दिवांकर नागपुरे, माधुरी क्षीरसागर, शिवकुमार गणवीर आदींनी केले.शालेय पोषण आहार कर्मचारी गेल्या १४ ते १५ वर्षांपासून ग्रामीण व नगरपरिषदांच्या शाळांमध्ये शालेय पोषण आहार शिजविण्याचे काम करीत आहेत. या कामासोबतच कर्मचाºयांना शाळा उघडणे, शाळेची देखरेख करणे, स्वच्छता राखणे, जेवणानंतर विद्यार्थ्यांचे ताट धुण्यापासून ते अनेकवेळा शौचालयही साफ करावे लागते. एवढे काम करूनही हाती केवळ महिन्याकाठी हजार रुपये पडतात. विशेष म्हणजे, शासनाने दोनदा आहार खर्चाच्या निधीमध्ये वाढ केली, परंतु स्वयंपाकी महिलांचे मानधन वाढविले नाही. याचा विरोध म्हणून महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियनच्यावतीने (आयटक) विधिमंडळावर मोर्चा काढला. मोर्चाच्या शिष्टमंडळाचे म्हणणे आहे की, २०१६ मध्ये पाच हजार मानधन वाढीच्या प्रस्तावाला घेऊन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी बैठक घेतली. परंतु निर्णय होऊ शकला नाही. ‘शापोआ’ कर्मचाऱ्यांना पाँडेचेरी राज्यात १४ हजार, केरळमध्ये १० हजार तर तामिळनाडूमध्ये ७ हजार ७०० रुपये मानधन दिले जाते. परंतु महाराष्ट्रातच स्वयंपाकी कर्मचाऱ्यांशी भेदभाव केला जात आहे.शालेय पोषण आहार  कर्मचाऱ्यांचे मानधन वाढवून सेवेत कायम करा, कर्मचाऱ्यांना १८ हजार रुपये वेतनश्रेणी द्या, नियमित वेळेत, महिन्याच्या पाच तारखेच्या आत मानधन द्या, कर्मचाऱ्यांना कमी करणाऱ्या शाळा व्यवस्थापन समिती मुख्यध्यापकांविरुद्ध कारवाई करा आदी मागण्या या मोर्चाच्या वतीने करण्यात आल्या.

टॅग्स :Nagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८Morchaमोर्चा