शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर-मुंबई दुरांतोत हवालाचे ३० लाख तर मुंबई-नागपूर दुरांतोत सोन्याची २९ पाकिटे जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 14:29 IST

दुरांतो एक्स्प्रेसने हवालाचे ३० लाख रुपये घेऊन मुंबईला जाण्यासाठी नागपूर रेल्वेस्थानकावर आलेल्या एका आरोपीला रेल्वे सुरक्षा दलाच्या गुन्हे शाखेने बुधवारी रात्री अटक केली. तर गुरुवारी मुंबईहून नागपूरला येणाऱ्या दुरांतोत सोन्याची २९ पाकिटे आणणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली.

ठळक मुद्देआरपीएफ गुन्हे शाखेची कारवाईदोन आरोपींना मुद्देमालासह अटकआयकर विभागाकडे सोपविले

आॅनलाईन लोकमतनागपूर :

मिळालेल्या माहितीच्या आधारे पहिली कारवाई बुधवारी रात्री ८.३० वाजता होम प्लॅटफार्मवर उभ्या असलेल्या १२२९० नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसच्या कोच क्रमांक एस-६, बर्थ ५७ वरून करण्यात आली. कारवाईबाबत मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांनी सांगितले की, आरपीएफच्या गुन्हे शाखेला एक व्यक्ती रात्री हवालाची रक्कम घेऊन जाणार असल्याची गुप्त माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या चमूने होम प्लॅटफार्मवर पाहणी केली. गुन्हे शाखेचे निरीक्षक भगवान इप्पर, संजय पुरकाम, विजय पाटील, दीपक वानखेडे, किशोर चौधरी, नीळकंठ गोरे यांना रात्री ८.३० वाजता दुरांतो एक्स्प्रेसच्या कोच एस-६ मध्ये एक प्रवासी संशयास्पद स्थितीत आढळला. त्याला लगेच ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. त्याने आपले नाव महेंद्र तरोडे (२८) रा. अकोला सांगितले. त्याला इंद्रायणी कुरीअरच्या वतीने ७ हजार रुपये वेतन आणि प्रत्येक ट्रीपमागे ७०० रुपये मिळत असल्याचे सांगितले. त्याने काहीच ठोस माहिती न दिल्यामुळे त्याला आरपीएफ ठाण्यात आणण्यात आले. तेथे त्याच्या ट्रॅव्हल बॅगची तपासणी केली असता त्यात ३० लाख रुपये आढळले. त्यात २८ लाख रुपयांच्या २ हजाराच्या नोटा तसेच उर्वरित ५०० रुपयांच्या नोटा आढळल्या. त्याची अधिक चौकशी केली असता संबंधित प्रवाशाने ही रक्कम मुंबईला नेत असल्याची माहिती दिली. त्यानंतर लगेच आयकर विभागाला सूचना देण्यात आली. आयकर विभागाची चमू गुरुवारी आरपीएफ ठाण्यात पोहोचल्यानंतर आरोपी आणि रक्कम त्यांच्या सुपूर्द करण्यात आली. मुंबई-नागपूर दुरांतोत सोन्याची २९ पाकिटे जप्तमुंबईवरून दुरांतो एक्स्प्रेसने नागपुरात सोन्याचे २९ पाकिटे आणणाऱ्या आरोपीला रेल्वे सुरक्षा दलाच्या गुन्हे शाखेने गुरुवारी सकाळी मुद्देमालासह अटक केली आहे.रेल्वे सुरक्षा दलाच्या गुन्हे शाखेला रेल्वेगाडी क्रमांक १२२८९ मुंबई-नागपुर दुरांतो एक्स्प्रेसमध्ये सोन्याची पाकिटे येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली. गुन्हे शाखेने ही माहिती कसारा येथील आरपीएफला दिली. त्या नुसार कसारा येथील आरपीएफ जवान संजय पाटील आणि इगतपुरी येथील आरपीएफचा जवान सज्जन गोरे हे दुरांतो एक्स्प्रेसमध्ये चढले. त्यांनी आरक्षणाच्या यादीतून शाम हे नाव शोधुन काढले असता आरोपी एस-७, बर्थ ४९ वर प्रवास करीत असल्याचे आढळले. त्यांनी आरोपीवर नागपुरात येईपर्यंत पाळत ठेवली. नागपुरात दुरांतो एक्स्प्रेस आल्यानंतर गुन्हे शाखेचे निरीक्षक भगवान इप्पर, आरपीएफ ठाण्याचे निरीक्षक वीरेंद्र वानखेडे, संजय पुरकाम, विजय पाटील, दीपक वानखेडे, किशोर चौधरी, नीळकंठ गोरे यांनी आरोपीला सोन्याच्या २९ पाकिटांसह अटक केली. आरोपीने आपले नाव शाम बंकुवाल (३८) रा. अकोला असे सांगून आपण इंद्रायणी कुरीयरसाठी काम करीत असल्याचे सांगितले. या कामासाठी ८ हजार रुपये वेतन आणि प्रत्येक फेरीमागे ७०० रुपये मिळत असल्याची माहिती त्याने दिली. आरपीएफने आयकर विभागाचे अधिकारी आणि सोन्याचे मुल्यमापन करणाऱ्या तज्ज्ञांना बोलावले. मुल्यमापन केल्यानंतर जप्त केलेले सोने आरोपीसह आयकर विभागाच्या स्वाधीन करण्यात आले.

टॅग्स :Crimeगुन्हा