शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील २९५२७ विद्यार्थी देणार शिष्यवृत्तीची परीक्षा; शहर आणि ग्रामीणमध्ये २०३ परीक्षा केंद्र

By गणेश हुड | Updated: February 16, 2024 19:05 IST

मागील तीन वर्षांत या परीक्षेकरीता प्रविष्ठ विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. 

नागपूर: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यावतीने पुर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ५ वी व पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ८ वीची संपुर्ण राज्यात रविवार १८ फेब्रुवारी २०२४ रोजी घेण्यात येणार आहे. यामध्ये नागपूर जिल्ह्यातील २९ हजार ५२७  विद्यार्थी प्रविष्ठ झालेले असून जिल्ह्यातील २०३ केंद्रावर परीक्षा होणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये पुरेशा मार्गदर्शना अभावी मागे पडतात. स्पर्धा परीक्षांमधील पहिली पायरी म्हणजे शिष्यवृत्ती परीक्षा होय. या परीक्षेसाठी जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी ‘एक तास शिष्यवृत्ती साठी’ हा उपक्रम राबवला जातो. यामुळे मागील तीन वर्षांत या परीक्षेकरीता प्रविष्ठ विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. 

शिष्यवृत्ती परीक्षेबाबत विद्यार्थ्यांचा कल वाढावा यासाठी जि.प.शाळांमधील विद्यार्थ्यांच्या या परीक्षेतील प्रवेश व परीक्षा शुल्कापोटी १५ लक्ष रुपयांची तरतूद जि.प. सेंस फंडातून केली आहे. यातुन जि.प. शाळांमधील शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ठ सर्व विद्यार्थ्यांची परीक्षेची फी भरण्यात आलेली आहे. जिल्ह्याचा सन २०२१ च्या मुख्य परीक्षेच्या पात्रता निकालाच्या टक्केवारीच्या तुलनेत सन २०२३ च्या निकालात चारपट वाढ झालेली असून हा एक तास शिष्यवृत्तीसाठी उपक्रम जि.प. शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी फलदायी ठरत असल्याचे दिसून येत आहे. तसेच या सराव परीक्षेचा लाभ निश्चितच विद्यार्थ्यांना मुख्य शिष्यवृत्ती परीक्षेत होणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी रोहीणी कुंभार यांनी दिली. सीईओ सौम्या शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली या परीक्षेची तयारी पूर्ण झाल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार यांनी दिली.

टॅग्स :nagpurनागपूरexamपरीक्षा