नागपूर : जिल्हा वार्षिक योजनेत ४१८ कोटींचा नितव्यय अर्थसंकल्पित झाला आहे. यातील १९३.१६ कोटींचा निधी प्राप्त झाला असून, २८.२९ कोटी खर्च झाल्याची माहिती पालकमंत्री नितीन राऊ त यांच्या अध्यक्षतेत मंगळवारी जिल्हा परिषदेच्या आबासाहेब खेडकर सभागृहात आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या आढावा बैठकीत देण्यात आली. २०१४-१५ मध्ये सर्वसाधारण योजना २२५ कोटी, अनुसूचित जाती उपयोजना १२१.९८ कोटी तसेच आदिवासी उपयोजना ७१ कोटी असा ४१८ कोटींचा नितव्यय अर्थसंकल्पित झालेला आहे. प्राप्त निधीतून ८४.८५ कोटींचा निधी वितरित करण्यात आला असल्याची माहिती बैठकीत अधिकाऱ्यांनी दिली.राज्य पीक विमा योजनेत जिल्ह्यातील १३,६६५ शेतकरी सहभागी झाले आहेत. ७,१०३ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर केलेली आहे. विमा हप्त्यापोटी भरलेल्या ९२.७६ लाखांच्या तुलनेत शेतकऱ्यांना २९२ लाखांचा लाभ होणार आहे. ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.(प्रतिनिधी)
विकास कामांवर २८ कोटींचा खर्च
By admin | Updated: August 8, 2014 01:10 IST