शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात २८ सफाई कर्मचारी बडतर्फ ; ३५ जणांची विभागीय चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 23:24 IST

कोणत्याही प्रकारची सूचना न देता ड्यूटीवर हजर न राहणाऱ्या २८ ऐवजदार सफाई कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करण्याचे तर ३५ स्थायी सफाई कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मंगळवारी दिले.

ठळक मुद्देआयुक्त तुकाराम मुंढे यांची मोठी कारवाई : ड्यूटीवर गैरहजर राहणाऱ्यांना दणका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोणत्याही प्रकारची सूचना न देता ड्यूटीवर हजर न राहणाऱ्या २८ ऐवजदार सफाई कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करण्याचे तर ३५ स्थायी सफाई कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मंगळवारी दिले. महापालिकेत प्रथमच इतकी मोठी कारवाई करण्यात आली. यामुळे कामावर हजर न राहणाऱ्या सफाई ऐवजदारांचे धाबे दणाणले आहे.आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारताच गैरहजर राहणाºया सफाई कर्मचाऱ्यांचा डाटा संकलित करण्याचे निर्देश आरोग्य विभागाला दिले होते. दीड महिन्यात गोळा करण्यात आलेल्या माहितीच्या आधारावर बडतर्फ करण्याची कारवाई करण्यात आली. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेतही मुंढे यांनी कठोर कारवाईचे संकेत दिले होते. ऐवजदार सफाई कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याला आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, महापालिकेत ६ हजार स्थायी तर २ हजार ११३ ऐवजदार सफाई कर्मचारी आहेत. प्रत्येक सफाई कर्मचाऱ्याने दररोज ५०० मीटर रस्ता स्वच्छ करणे आवश्यक आहे. परंतु मोठ्या प्रमाणात सफाई कर्मचारी ड्यूटीवर नसतात. वेगवेगळी कारणे सांगून अनेक कर्मचारी अनेक दिवस बेपत्ता असतात. परंतु त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही. आयुक्तांनी दररोज ड्यूटीवर हजर राहणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांची यादी मागविणे सुरू केले. यात अनेक दिवस बेपत्ता असलेल्या कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याचा निर्णय घेतला.विशेष म्हणजे सफाई कर्मचाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी डिसेंबर २०१७ मध्ये ८ हजार कर्मचाऱ्यांना जीपीएस घड्याळ देण्यात आल्या. परंतु तांत्रिक कारण पुढे करून त्या चालत नसल्याचे सांगण्यात आले. कर्मचाऱ्यांनी याला विरोध केला. ऑगस्ट २०१९ ते ऑक्टोबर २०१९ घड्याळ चालत नसल्याचे सांगून ही योजना बंद करण्यात आली. परंतु नोव्हेंबर २०१९ मध्ये पुन्हा सुरू करण्यात आली. मुंढे यांनी पदभार स्वीकारताच घड्याळ पूर्ण क्षमतेने काम करू लागली. सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन जीपीएस घड्याळाच्या उपस्थितीशी जोडण्याचा निर्णय घेण्यात आला.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाEmployeeकर्मचारी