शहरं
Join us  
Trending Stories
1
Cyclone Ditva: 'दितवाह' चक्रीवादळ भारताच्या दिशेने; श्रीलंकेत ४६ जणांचा बळी, 'या' राज्यांमध्ये सतर्कतेचा इशारा!
2
धक्कादायक! अंत्यसंस्कारासाठी जात असताना डंपर कारवर उलटला, एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू
3
पाकिस्तानात जोरदार राडा! खैबर-पख्तूनख्वाच्या मुख्यमंत्र्यांना पोलिसांनी लाथा-बुक्क्यांनी मारले; इम्रान खान मृत्यू प्रकरण...
4
पुतिन यांच्या भारत दौऱ्याची तारीख ठरली; पीएम मोदींशी ऊर्जा, संरक्षण, व्यापारावर होणार चर्चा
5
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
6
दत्त जयंती २०२५: ७ दिवस शक्य नाही, मग ३ दिवसांत गुरुचरित्र पारायण करता येते; कसे? पाहा, नियम
7
स्मृति मानधना आणि पलाश मुच्छल यांचे लग्न कधी होणार? आई अमिता मुच्छल यांनी दिली मोठी अपडेट
8
दमदार कमाईची संधी! ५४२१ कोटींचा IPO ३ डिसेंबरला उघडणार; जीएमपी-प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
9
वैभव सूर्यवंशी पुन्हा एकदा टीम इंडियाकडून खेळणार, संघाचे नेतृत्व 'मराठी मुलगा' करणार !
10
रिलायन्स इंडस्ट्रीजला ५६.४४ कोटी रुपयांची जीएसटी नोटीस, पाहा काय आहे प्रकरण?
11
Maharashtra Crime: प्रचार करत असतानाच भाजप उमेदवारावर जीवघेणा हल्ला; अनिकेत नाकाडेंसोबत काय घडलं?
12
AI च्या मदतीने बनवला एसी लोकल पास, अंबरनाथमधील इंजिनिअर पती- उच्चशिक्षित पत्नीला अटक; दोघे कसे अडकले?
13
Elephant Attack: स्कूटरवरून खेचलं, सोंडेनं उचलून जमिनीवर आपटलं, मग...; हत्तीच्या हल्ल्यात मुलगा ठार
14
संतापजनक! १५ एप्रिल रोजी कोर्ट मॅरेज,२२ नोव्हेंबरला पत्नीची हत्या; नेमके प्रकरण काय?
15
नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुका ठरलेल्या वेळेनुसार होणार, स्थगिती नाही: सुप्रीम कोर्ट
16
फायरिंगचा शौक! कपिल शर्मा कॅफे गोळीबार प्रकरणात अटक केलेला बंधू मान सिंह आहे तरी कोण?
17
'सहारा'त अडकलेले कोट्यवधी रुपये परत मिळणार! 'हे' ठेवीदार ऑनलाइन करू शकतात अर्ज
18
"ते जिवंत असल्याचा कोणता पुरावाही नाहीये"; इम्रान खानचा मुलगा झाला भावूक, पाकिस्तान सरकारवर गंभीर आरोप
19
Black Friday Sale 2025: ब्लॅक फ्रायडे सेलमध्ये ६५% पर्यंत स्वस्तात मिळताहेत TV-फ्रिज; पाहा ऑफर आणि किंमत
20
निधनापूर्वी धर्मेंद्र यांनी पाहिला होता हा चित्रपट, आमिर खानचा खुलासा, म्हणाला - 'ती स्क्रिप्ट त्यांना...'
Daily Top 2Weekly Top 5

वॉरंट निघाल्याचे सांगून वृद्ध आर्किटेक्टचे २.७५ लाख हडपले; सायबर गुन्हेगारांचे कृत्य

By दयानंद पाईकराव | Updated: June 22, 2024 17:53 IST

धंतोली ठाण्यात गुन्हा दाखल, आरोपीने आमच्या साहेबांसोबत बोला असे म्हणून फोन आपल्या साथीदाराला दिला.

नागपूर : तुम्ही मोबाईल लाऊन इतरांना त्रास देता त्यामुळे तुमच्या विरुद्ध पकड वारंट निघाला आहे, अशी बतावणी करून वारंट रद्द करण्यासाठी सायबर गुन्हेगारांनी एका वृद्ध आर्किटेक्टची २.७५ लाखांनी फसवणूक केली. ही घटना धंतोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत १४ फेब्रुवारीला घडली असून पोलिसांनी सायबर गुन्हेगारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

विनोद रामदास गणवीर (७५, रा. प्लॉट नं. ३०४, शुअरटेक हॉस्पीटलजवळ) असे फसवणूक झालेल्या वृद्ध आर्किटेक्टचे नाव आहे. ते सेवानिवृत्त झाले असून धंतोलीत त्यांचे कार्यालय आहे. ते १४ फेब्रुवारीला आपल्या घरी असताना त्यांच्या लँडलाईनवर आरोपीने फोन केला. आपण सीबीआय मुंबई येथून बोलत असून तुमच्या विरुद्ध इतरांना फोन करून त्रास देता असा गुन्हा दाखल झाला असल्याचे सांगितले. त्यानंतर आरोपीने आमच्या साहेबांसोबत बोला असे म्हणून फोन आपल्या साथीदाराला दिला. त्याच्या साथीदाराने तुमचा वारंट रद्द करण्यासाठी २ लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले.

त्यामुळे घाबरलेल्या गणवीर यांनी आरोपीच्या बँक खात्यात आरटीजीएसद्वारे २ लाख रुपये जमा केले. त्यानंतर आरोपींनी पुन्हा गणवीर यांना या केसमधून बाहेर काढण्यासाठी ७५ हजार रुपये घेऊन त्यांची २.७५ लाखांनी फसवणूक केली. या प्रकरणी गणवीर यांनी दिलेल्या तक्रारीवरून धंतोली पोलिसांनी अज्ञात दोन आरोपींविरुद्ध कलम ४१९, ४२०, सहकलम ६६ (ड) आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.