शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर शहरातील ११३ रोडवर २७०४ धोकादायक वीजखांब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 21:10 IST

ऐकून कुणालाही आश्चर्य वाटेल, पण हे खरे आहे. रुंदीकरणाच्या कामामुळे शहरातील ११३ रोडवरील २७०४ वीजखांब, ३६८ डीपी/टीपी/एफपी व १०० ट्रान्सफॉर्मर धोकादायक झाले आहेत. ते वाहतुकीस अडथळा ठरत आहेत.

ठळक मुद्देमनपाचे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र : स्थानांतरणासाठी मागितली मुदतवाढ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ऐकून कुणालाही आश्चर्य वाटेल, पण हे खरे आहे. रुंदीकरणाच्या कामामुळे शहरातील ११३ रोडवरील २७०४ वीजखांब, ३६८ डीपी/टीपी/एफपी व १०० ट्रान्सफॉर्मर धोकादायक झाले आहेत. ते वाहतुकीस अडथळा ठरत आहेत. तसेच, अपघाताला निमंत्रण देत आहेत. त्यामुळे त्यांना तात्काळ स्थानांतरित करणे आवश्यक झाले आहे.महानगरपालिकेने शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर करून ही माहिती दिली. यासंदर्भात न्यायालयात जनहित याचिका प्रलंबित आहे. ती याचिका न्यायालयाने स्वत:च दाखल करून घेतली आहे. सुरुवातीला केवळ १९ रोडवरील धोकादायक वीजखांब व ट्रान्सफॉर्मरचा मुद्दा न्यायालयासमक्ष होता. दरम्यान, न्यायालयाने शहरात होत असलेली रोड रुंदीकरणाची कामे लक्षात घेता अन्य रोडचे सर्वेक्षण करून धोकादायक वीजखांब व ट्रान्सफॉर्मर शोधण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार, महानगरपालिका व महावितरण यांनी मिळून रोडचे सर्वेक्षण केले. त्यातून त्यांना ११३ रोडवरील २७०४ वीजखांब, ३६८ डीपी/टीपी/एफपी व १०० ट्रान्सफॉर्मर धोकादायक असल्याचे आढळून आले. त्यात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व एमएसआरडीसी यांच्या अखत्यारितील प्रत्येकी १ रोडचा तर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील १५ रोडचा समावेश आहे. इतर रोड महापालिकेच्या अधिकार क्षेत्रात आहेत. हे सर्व धोकादायक वीजखांब, ट्रान्सफॉर्मर व अन्य वीज उपकरणे सुरक्षित ठिकाणी स्थानांतरित करण्यासाठी महानगरपालिकेने न्यायालयाला चार महिन्यांची मुदत वाढवून मागितली आहे.न्यायालयाच्या आदेशावरून महानगरपालिकेने महावितरणच्या मदतीने सुरुवातीच्या १९ रोडवरील वीजखांब व ट्रान्सफॉर्मर स्थानांतरित करण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. त्यापैकी २ रोडवरील काम पूर्ण झाले आहे. इतर रोडवरील काम प्रगतिपथावर आहे. हे काम करण्यासाठी रोज ६ ते ८ तास वीजपुरवठा बंद ठेवणे आवश्यक आहे. परंतु, नागरिक वीजपुरवठा बंद ठेवण्याला विरोध करतात. पाऊसही कामात अडथळा निर्माण करीत आहे. त्यामुळे कामाला गती मिळाली नाही, असे महापालिकेने न्यायालयाला सांगितले आहे.प्रगती अहवाल देण्याचा आदेशधोकादायक वीजखांब व ट्रान्सफॉर्मर हटविण्याच्या कामाचा रोडनिहाय प्रगती अहवाल सादर करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी महापालिकेला दिला. याकरिता महापालिकेला दोन आठवड्यांचा वेळ देण्यात आला. तसेच, न्यायालयाने महानगरपालिकेचे प्रतिज्ञापत्रही रेकॉर्डवर घेतले. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय अतुल चांदुरकर व विनय जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. या प्रकरणात अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर न्यायालय मित्र असून मनपातर्फे अ‍ॅड. सुधीर पुराणिक तर, नासुप्रतर्फे अ‍ॅड. गिरीश कुंटे यांनी कामकाज पाहिले.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयelectricityवीजNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका