शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पायाभूत सुविधांच्या विकासाला ‘बूस्ट’, महामार्ग विस्तारासाठी २.७० लाख कोटी

By योगेश पांडे | Updated: February 1, 2023 16:20 IST

Budget 2023 : मागील वर्षीच्या तुलनेत ३६ टक्के अधिक निधी : लहान शहरांमधील ‘इन्फ्रा’च्या विकासावर भर

नागपूर : पायाभूत सुविधांच्या विकासात महामार्गांची मौलिक भूमिका असते व हीच बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारतर्फे भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयासाठी तब्बल २.७० लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे ३५.६६ टक्के जास्त निधीची तरतूद करण्यात आली आहे.

देशभरात महामार्गांचे जाळे विस्तारण्यावर यंदादेखील भर देण्यात आला आहे. २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात २५ हजार किलोमीटरचे ‘टार्गेट’ ठेवण्यात आले होते. यासाठी यंदा निधीत वाढ करण्यात आली आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात १४ हजार ५०० किलोमीटरच्या महामार्ग बांधणीचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.

‘टीअर-२’, ‘टीअर-३’ शहरांसाठी ‘युआयडीएफ’

‘टीअर-२’, ‘टीअर-३’ शहरांत पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी ‘युआयडीएफ’ची(अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेन्ट फंड) स्थापना करण्यात येणार आहे. नॅशनल हाऊसिंग बॅंकेतर्फे याचे व्यवस्थापन करण्यात येईल. दरवर्षी १० हजार कोटींच्या निधीचा यात खर्च होण्याची अपेक्षा आहे.

भांडवली गुंतवणूक १० लाख कोटींपर्यंत

पायाभूत सुविधांच्या माध्यमातून गुंतवणूकीची संधी असून रोजगारनिर्मितीदेखील होते. कोरोनानंतर खाजगी गुंतवणूक परत वाढत आहे. हीच बाब लक्षात घेऊन भांडवली गुंतवणुकीचा परिव्यय सलग तिसऱ्या वर्षी ३३ टक्क्यांनी म्हणजेच १० लाख कोटींपर्यंत वाढविण्यात आला आहे. हा आकडा जीडीपीच्या ३.३ टक्के असेल.

१०० प्रकल्पांसाठी ७५ हजार कोटी

बंदरे, कोळसा, पोलाद, खते आणि अन्नधान्य क्षेत्रांच्या उद्योगांमधील ‘कनेक्टिव्हिटी’ वाढविण्यासाठी १०० प्रकल्प उभारण्यात येतील. उद्योग व प्रकल्पांना जोडणे हे यामागचे मुख्य उद्दीष्ट असेल. यासाठी एकूण ७५ हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित असून यातील १५ हजार कोटी खाजगी क्षेत्राकडून उभारण्यात येतील.

इतर प्रमुख तरतुदी

  • पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमध्ये गुंतवणूक वाढावी यासाठी राज्य शासनांना व्याजमुक्त कर्जाच्या योजनेला एका वर्षाची मुदतवाढ
  • रेल्वेसाठी २.४ लाख कोटींचा अर्थसंकल्प. यात अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी तरतूद करण्यात आली आहे.
  • प्रादेशिक हवाई यंत्रणा मजबूत करण्यासाठी ५० पन्नास अतिरिक्त विमानतळ, हेलीपोर्ट, वॉटर एरोड्रोम आणि अत्याधुनिक लँडिंग ग्राउंड्सचे पुनरुज्जीवन करण्यात येणार.
टॅग्स :Budgetअर्थसंकल्प 2023Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनhighwayमहामार्गroad transportरस्ते वाहतूक