शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात २७ दिवसांत गॅस्ट्रोचे २७० रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 23:40 IST

शहराचे तापमान वाढत असताना उष्माघातासोबतच गॅस्ट्रोच्या रुग्णांची संख्याही वाढत चालली आहे. उष्माघाताचे आतापर्यंत १४२ रुग्णांची नोंद झाली असताना गॅस्ट्रो रोगानेही तोंड वर काढले आहे. २७ एप्रिलपर्यंत या रोगाचे २७० रुग्णांना भरती करून उपचार करण्यात आले. ही आकडेवारी केवळ मनपाच्या आयसोलेशन दवाखान्यातील आहे. मेयो, मेडिकलमध्ये याच्या दुप्पट रुग्ण असावेत, अशी माहिती आहे.

ठळक मुद्देआयसोलेशनमध्ये वाढले रुग्ण: उष्माघाताच्या १४२ रुग्णांची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहराचे तापमान वाढत असताना उष्माघातासोबतच गॅस्ट्रोच्या रुग्णांची संख्याही वाढत चालली आहे. उष्माघाताचे आतापर्यंत १४२ रुग्णांची नोंद झाली असताना गॅस्ट्रो रोगानेही तोंड वर काढले आहे. २७ एप्रिलपर्यंत या रोगाचे २७० रुग्णांना भरती करून उपचार करण्यात आले. ही आकडेवारी केवळ मनपाच्या आयसोलेशन दवाखान्यातील आहे. मेयो, मेडिकलमध्ये याच्या दुप्पट रुग्ण असावेत, अशी माहिती आहे.शासकीय रुग्णालयांच्या शीत वॉर्डमध्ये उष्माघाताच्या रुग्णांची संख्या कमी आह. मात्र दूषित अन्न व पाण्यामुळे होणाऱ्या गॅस्ट्रोच्या रोगाच्या रुग्णांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मनपाच्या आयसोलेशन रुग्णालयाने उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल महिन्यात आतापर्यंत बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) १२०० रुग्णांनी उपचार घेतले तर २७० रुग्णांना भरती करण्यात आले होते. भीषणपाणीटंचाईमुळे पुढील दोन महिन्यात दूषित पाण्याचा वापर वाढल्यास याच्या चारपट रुग्णांत वाढ होण्याची शक्यता आहे.उष्माघाताचे मृत्यू नाहीतमनपाचे आरोग्य अधिकारी (एम) डॉ. सरिता कामदार यांनी सांगितले, एप्रिल महिन्यापासून उष्माघाताच्या रुग्णांची नोंद ठेवली जात आहे. आतापर्यंत २७० रुग्णांची नोंद झाली आहे. तूर्तास उष्माघात मृत्यूची नोंद नाही.बालकांना सांभाळामेडिकल व मेयो रुग्णालयात गॅस्ट्रोच्या रुग्णांत वाढ झाली असून, यात बालकांची संख्या मोठी असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. रोज ३० ते ४० टक्के रुग्ण या आजाराचे दिसून येतात. उन्हाच्या कडाक्यामुळे उष्माघाताची लक्षणे असलेले रुग्ण, सर्दी, खोकला आदी किरकोळ आजारांनी लहान मुले ग्रस्त आहेत. गढूळ पाणी पिणे, शिळे अन्न, उन्हात फिरणे आदी कारणामुळे लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम होतो.५० टक्के गॅस्ट्रोचे रुग्णगॅस्ट्रोची लक्षणे असलेल्या आजाराची ५० ते ६० टक्के रुग्ण रोज उपचारासाठी येत आहेत. यातील गंभीर रुग्णांवर भरती करून उपचार केले जात आहेत. हा आजार दूषित अन्न व पाण्यामुळे होतो. यामुळे प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. या दिवसांत शीतपेय, आईसगोलामधून खाल्ला जाणारा बर्फ धोकादायक ठरत आहे. जेवणाआधी स्वच्छ हात धुणे आवश्यक आहे.-डॉ. अविनाश गावंडेबालरोग तज्ज्ञमनपाकडून विविध उपाययोजनामहानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून उष्माघात व गॅस्ट्रोवर विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. सर्व मनपाचे झोन कार्यालय व दवाखान्यांवर ग्रीन मॅट टाकण्यात आल्या आहेत. येथे पिण्याच्या पाण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. मजुरांना उष्माघाताचा धोका होऊ नये म्हणून मेट्रो व सिमेंट रस्त्यांची कामे दुपारी १२ ते ३ या वेळात बंद ठेवण्याची विनंती करण्यात आली आहे. सर्व उद्याने दुपारी सुरू ठेवली जात आहेत. आपली बस व एसटी महामंडळाच्या बसचालकांना उन्हात निघताना भरपूर पाणी पिण्याचा व पाण्याची बॉटल्स सोबत ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सार्वजनिक पाणपोर्इंना पाण्याची शुद्धता पाळण्याकडे लक्ष देण्यास सांगण्यात आले आहे.-डॉ. सरिता कामदारआरोग्य अधिकारी, मेडिसीन विभाग, मनपा

टॅग्स :Medicalवैद्यकीयHealthआरोग्य