शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर हवामानशास्त्र विभागातील २७ कर्मचारी निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 12:03 IST

हवामानशास्त्र विभागाच्या नागपूर प्रादेशिक कार्यालयातील अनुसूचित जमाती प्रवर्गातून नोकरी मिळविणाऱ्या २७ कर्मचाऱ्यांना जात वैधता प्रमाणपत्र नसल्यामुळे निलंबित करण्यात आले आहे.

ठळक मुद्देहायकोर्टात आव्हान जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हवामानशास्त्र विभागाच्या नागपूर प्रादेशिक कार्यालयातील अनुसूचित जमाती प्रवर्गातून नोकरी मिळविणाऱ्या २७ कर्मचाऱ्यांना जात वैधता प्रमाणपत्र नसल्यामुळे निलंबित करण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांनी त्या आदेशासह विभागीय चौकशी व जात प्रमाणपत्र कायद्याच्या कलम ७ मधील तरतुदीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले आहे.याचिकाकर्त्यांमध्ये विनायक नंदनवार व इतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ते हलबा, छत्री व नहुल जातीचे असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. त्यांना १९७८ ते १९९१ या कालावधीत जात प्रमाणपत्रे जारी करण्यात आली आहेत. त्या आधारावर त्यांना १९८२ ते १९९८ या कालावधीत अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव जागांवर नियुक्त्या देण्यात आल्या. नियुक्तीच्या वेळीच जात प्रमाणपत्रे पडताळण्यात आली होती. त्यामुळे दुसऱ्यांदा पडताळणी करण्याची आवश्यकता नाही. परंतु, जात प्रमाणपत्र कायद्याच्या कलम ७ अनुसार जात प्रमाणपत्राची पडताळणी केली नाही म्हणून हवामानशास्त्र विभागाने १३ आॅगस्ट २०१८ रोजी निलंबनाची कारवाई केली. तत्पूर्वी १६ जुलै २०१८ रोजी विभागीय चौकशीसाठी दोषारोप कळविण्यात आले. ही संपूर्ण कारवाई अवैध आहे. त्यामुळे विभागीय चौकशी व निलंबनाचा आदेश रद्द करण्यात यावा आणि जात प्रमाणपत्र कायद्याच्या कलम ७ मधील तरतूद घटनाबाह्य घोषित करण्यात यावी, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.

केंद्र व राज्य सरकारला नोटीसउच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व मुरलीधर गिरटकर यांनी गुरुवारी प्रकरणावर सुनावणी केल्यानंतर हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक व राज्याचे मुख्य सचिव यांना नोटीस बजावून तीन आठवड्यांत उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. तुषार मंडलेकर व अ‍ॅड. रोहन मालविया यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :Courtन्यायालय