शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
3
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
4
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
5
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
6
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
7
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
8
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
9
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
10
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
11
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
12
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
13
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
14
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
15
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
16
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
17
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
18
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
19
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
20
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 

नागपूर मेडिकलच्या सोलर प्रकल्पासाठी २७ कोटी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 22:31 IST

सौर ऊर्जा प्रकल्प आज काळाची गरज आहे. शासकीय रुग्णालयांना त्यांचा खर्च पाहता, विजेचा खर्च परवडणारा नाही. २४ तास कमी खर्चात वीज उपलब्ध व्हावी यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) ४.५ मेगावॅट क्षमतेचा सौरऊर्जा (सोलर) प्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पासाठी २७ कोटी रुपये उपलब्ध करून दिले जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी येथे दिली.

ठळक मुद्देपालकमंत्री बावनकुळे यांची ग्वाही : छातीरोग विभागाच्या विकासासाठी पाच कोटींचा निधी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सौर ऊर्जा प्रकल्प आज काळाची गरज आहे. शासकीय रुग्णालयांना त्यांचा खर्च पाहता, विजेचा खर्च परवडणारा नाही. २४ तास कमी खर्चात वीज उपलब्ध व्हावी यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) ४.५ मेगावॅट क्षमतेचा सौरऊर्जा (सोलर) प्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पासाठी २७ कोटी रुपये उपलब्ध करून दिले जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी येथे दिली.मेडिकलच्या क्षय व ऊररोग विभागाच्यावतीने सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ‘स्लीप’ व ‘एनआयव्ही’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे, इंग्लड येथील रॉयल कॉलेजचे प्राध्यापक व छाती तज्ज्ञ डॉ. मिलिंद सोवानी, लखनौ येथील ज्येष्ठ छातीरोग तज्ज्ञ डॉ. एस.एन. गुप्ता व विभागप्रमुख डॉ. सुशांत मेश्राम उपस्थित होते.पालकमंत्री बावनकुळे म्हणाले, सोलर प्रकल्प उभारून सौर ऊर्जेद्वारे विजेचे उत्पादन जास्तीतजास्त केल्यास वातावरणातील कार्बन डायआॅक्साईडचे प्रमाण कमी होऊन प्रदूषण कमी होते. ऊर्जेची कमतरता भासणार नाही. मेडिकलच्या इमारतीवर हा प्रकल्प उभारला जाईल, यासाठी मेडिकल प्रशासनाने पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. छाती रोग विभागाचे अद्यावतीकरण व यंत्रसामुग्रीसाठी पाच कोटी रुपयांचाही निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासनही बावनकुळे यांनी दिले.मेडिकल सर्वाेत्कृष्ट संस्था व्हावी -डॉ. निसवाडेमेडिकलमध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, ट्रॉमा केअर सेंटर, प्रत्यारोपण सेंटर रुग्णसेवेत आहे. याचा मोठा फायदा रुग्णांना होत आहे. लवकरच रोबोटिक सर्जरी विभाग, स्पाईन सेंटर, कॅन्सर हॉस्पिटल, लंग इन्स्टिट्यूट उभारले जाणार आहे. मेडिकल ही संस्था देशातील नव्हे तर जगातील सर्वाेत्कृष्ट संस्था व्हावी यासाठी प्रयत्न केले जात आहे, असे प्रतिपादन डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी येथे केले.

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेGovernment Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय