शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
4
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
5
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
6
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
7
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
8
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
9
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
10
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
11
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
12
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
13
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
15
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
16
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
17
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
18
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
19
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
20
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान

स्टील प्लॅन्टवर २७ कोटींची जप्ती

By admin | Updated: June 27, 2014 00:31 IST

उत्पादित मालाचा दैनंदिन रिपोर्ट नाही, क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक, उत्पादन शुल्काचा भरणा न करणे या कारणांखाली केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाने येथील एमईएल स्टिल प्लँटवर जप्तीची

चंद्रपूर: उत्पादित मालाचा दैनंदिन रिपोर्ट नाही, क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक, उत्पादन शुल्काचा भरणा न करणे या कारणांखाली केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाने येथील एमईएल स्टिल प्लँटवर जप्तीची कारवाई करुन सुमारे २७ कोटींचे साहित्य जप्त केल्याची माहिती विश्वसनीय सूत्राने दिली. चंद्रपूर-मूल मार्गावर महाराष्ट्र इलेक्ट्रोस्मेल्ट लिमिटेड हा स्टिल कारखाना आहे. २३ जून रोजी एमईएलमधून ११ ओव्हरलोड ट्रक भिलाईकडे रवाना झाले. केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने हे ट्रक मूलजवळ पकडले. साहित्य व कागदपत्रांची चौकशी केली असता ट्रकमधून क्षमतेपेक्षा अधिक माल वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले. शिवाय कोणतेही कागदपत्र समाधानकारक असल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे हे ११ ट्रक जप्त करून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. सध्या हे अकराही ट्रक मूल येथील पृथ्वी फेरो अलाईन्ससमोर उभे करण्यात आले आहेत.या कारवाईनंतर केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने कारखान्यावर धाड टाकली. तेव्हा व्यवस्थापनाने सहा महिन्यांपासून उत्पादित मालाचा दैनंदिन रिपोर्ट अद्ययावत ठेवला नसल्याचे आढळून आले. याशिवाय उत्पादन शुल्कही नियमित भरले नसल्याचे आढळून आले. त्यामुळे उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने कारखान्यावर जप्तीची कारवाई करीत २७ कोटींचे साहित्य जप्त केले. या प्रकरणाची केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाने कसून चौकशी सुरू केली असून यात अनेक बडे अधिकारी गळाला लागण्याची शक्यता आहे. याबाबत केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता त्यांनी या कारवाईला दुजोरा दिला. क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक होत असल्याने ट्रक जप्त केले. या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे त्या अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.(शहर प्रतिनिधी)