शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘आपली बस’वर २६ कोटी थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 10:22 IST

पूर्वीची ‘स्टार’ व आताची ‘आपली बस’कडे प्रवासी कर, बालपोषण कर व दंडात्मक रक्कम असे २६ कोटी ६२ लाख थकीत आहे. धक्कादायक म्हणजे महानगरपालिकेने २००७ पासून हा कर भरलेलाच नाही.

ठळक मुद्दे२००७ पासून भरला नाही करलोकलेखा समिती घेणार निर्णय

सुमेध वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पूर्वीची ‘स्टार’ व आताची ‘आपली बस’कडे प्रवासी कर, बालपोषण कर व दंडात्मक रक्कम असे २६ कोटी ६२ लाख थकीत आहे. धक्कादायक म्हणजे महानगरपालिकेने २००७ पासून हा कर भरलेलाच नाही. २०१५ मध्ये हा कर वसूल करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) शंभरावर बस अडकवूनही ठेवल्या होत्या. परंतु नंतर राजकीय हस्तक्षेप वाढल्याने बस सोडाव्या लागल्या. आता थकीत कराचा प्रश्न लोकलेखा समितीसमोर आला आहे. मनपाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.मुंबई मोटार वाहन कर कायदा १९६९नुसार प्रवासी कर हा प्रति तिकीटावर साडे सतरा टक्के लावला जातो. प्रति तिकिटावर बालपोषण कर १५ पैसे आकारल्या जातो. वेळेत कर न भरल्यास २५ टक्के दंडाची भर पडते. ‘आपली बस’ प्रकल्पाच्या माध्यमातून महापालिका शहर बससेवा चालवीत आहे. त्यापूर्वी म्हणजे २००७ च्या करारानुसार शहरात बससेवेचे संचालन ‘स्टार बस’ या नावाने मे. वंश निमय इन्फ्रापोजेक्टस् प्रा.लि.कडे होते. परंतु या कंपनीने किंवा महानगरपालिकेने हा कर आरटीओच्या तिजोरीत जमाच केला नाही. यामुळे २००७ ते डिसेंबर २०१८ पर्यंत प्रवासी कराची रक्कम १७ कोटी ६ लाख, बाल पोषण कराची रक्कम ४ कोटी २६ लाख तर दंडाची रक्कम ४ कोटी ७ लाख अशी एकूण २६ कोटी ६२ लाखांवर पोहचली आहे. थकीत कर जमा करण्यासाठी आरटीओ कार्यालयाने महानगरपालिकेला वारंवार पत्रही दिले आहे.सामान्य वाहतूकदाराचे प्रवासी कर थकीत असल्यास आरटीओ कार्यालय संबंधित वाहन तत्काळ जप्त करते. दंड भरल्यावरच वाहन सोडते.मात्र २००७ पासून मनपाने न भरलेल्या प्रवासी कराची दखल आरटीओ शहर कार्यालयाने २०१५ मध्ये घेतली. त्यावेळी १००वर स्टार बसवर कारवाई करण्यात आली. या बसेस आरटीओ कार्यालयात अडकवून ठेवल्या होत्या. परंतु राजकीय दबाव वाढताच या बसेस सोडण्यात आल्या. मात्र अद्यापही प्रवासी कर, बालपोषण कर व त्यावरील दंड भरलेला नाही.२०१४-१५ मध्ये असलेल्या मनपाच्या स्टार बसवरील ७ कोटी ८६ लाखांच्या थकीत कराचा प्रश्न आता लोकलेखा समितीसमोर आला आहे. समितीची बैठक आज मंगळवार १२ फेब्रुवारी रोजी मुंबईत होणार आहे. समितीचे अध्यक्ष आमदार गोपालदास अग्रवाल यावर काय निर्णय घेतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Taxकर