शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

क्रीडा संकुलासाठी २६ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 01:45 IST

उमरेड रोडवरील मौजा हरपूर येथे मोठ्या ताजबागच्या बाजूला महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ आणि नागपूर सुधार प्रन्यास यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात येणाºया क्रीडा संकुलाचे उर्वरित काम लवकरच सुरू होणार आहे.

ठळक मुद्देदक्षिण नागपूरला दिवाळी भेट : आॅलिम्पिक दर्जाच्या सोई देणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उमरेड रोडवरील मौजा हरपूर येथे मोठ्या ताजबागच्या बाजूला महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ आणि नागपूर सुधार प्रन्यास यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात येणाºया क्रीडा संकुलाचे उर्वरित काम लवकरच सुरू होणार आहे. कामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी शुक्रवारी या कामासाठी २६ कोटी रुपये मंजूर केले. आॅलिम्पिक दर्जाच्या सोई असणारे क्रीडा संकुलाच्या रूपात दक्षिण नागपूरला दिवाळीची भेट मिळाली आहे.या क्रीडा संकुलाच्या कामाबाबत शुक्रवारी मुंबईत सह्याद्री अतिथीगृह येथे कामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. तीत आमदार सुधाकर कोहळे, सहसचिव (कामगार) अरुण विधळे, कामगार मंत्र्यांचे खासगी सचिव मारुती मोरे, अवर सचिव संजीव गुप्ते, कल्याण आयुक्त सतीश दाभाडे, नागपूर सुधार प्रन्यासचे कार्यकारी अभियंता संजय चिमुरकर, वास्तुशास्त्रज्ञ शशी प्रभू, प्रकल्पाचे कंत्राटदार नीलेश जामदार आदी उपस्थित होते. या क्रीडा संकुलाचे काम २००४ मध्ये हाती घेण्यात आले होते. तांत्रिक कारणास्तव हा प्रकल्प २०१० पासून रखडला होता. मौजा हरपूर येथे ९.५० एकर जागेवर उभारण्यात येणाºया या प्रकल्पामुळे शहराच्या वैभवात भर पडणार असून उदयोन्मुख खेळाडूंना अत्याधुनिक क्रीडा सुविधा उपलब्ध होऊ शकतील.दक्षिण नागपूरचे आमदार सुधाकर कोहळे यांनी विधानसभेत या क्रीडा संकुलाचे काम रखडल्याकडे सरकारचे लक्ष वेधले होते. नागपुरातील क्रीडा विकाससाठी काम लवकर सुरू करण्याची मागणी त्यांनी केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही निवेदन दिले होते. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या प्रकल्पाबाबत बैठक झाली होती. त्यात मंडळाच्या शासनाकडे असलेल्या थकीत निधीतून या प्रकल्पाचे उर्वरित काम पूर्ण करण्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली होती. त्यानुसार या निधीतून प्रकल्पाचे उर्वरित काम पूर्ण करण्याबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली. तूर्तास मंडळाकडे असलेल्या संचित निधीतून प्रकल्पाचे काम सुरू करण्यास बैठकीत मान्यता देण्यात आली असून याबाबत शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश कामगार मंत्र्यांनी दिले आहेत. २००४ मध्ये हाती घेण्यास आलेल्या या प्रकल्पाची मूळ किंमत १२ कोटी होती. प्रकल्पाचे सुमारे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. हा प्रकल्प मार्गी न लागल्यास त्याच्या किमतीत वाढ होत राहील, ही बाब लक्षात घेता या प्रकल्पातील अडथळे दूर करावे व उर्वरित कामासाठी कालमर्यादा निश्चित करावी. तसेच क्रीडा संकुल उभारताना जागतिक दर्जार्चेिनकष पाळण्यात यावेत, अशा सूचना कामगार मंत्र्यांनी केल्या.