शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विभागात वर्षभरात शेतकऱ्यांची २५१ आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 00:10 IST

नागपूर विभागातील शेतकरी आत्महत्येची समस्या अद्यापही कायम आहे. विभागात मागील पाच वर्षांत १५०० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.

ठळक मुद्देपाच वर्षांत शेतकरी आत्महत्यांमध्ये घट : १५०० हून अधिक शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर विभागातील शेतकरी आत्महत्येची समस्या अद्यापही कायम आहे. विभागात मागील पाच वर्षांत १५०० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. दरवर्षी शेतकरी आत्महत्येचा आकडा घटत असून २०१९ मध्ये वर्षभरात २५१ शेतकऱ्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले. यापैकी ४१ टक्के शेतकऱ्यांचे कुटुंबीयच मदतीसाठी पात्र ठरले. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी महितीच्या अधिकारांतर्गत विभागीय आयुक्त कार्यालयाकडे शेतकरी आत्महत्यासंदर्भात विचारणा केली होती. वर्ष २०१५ ते २०१९ या कालावधीत नागपूर विभागात किती शेतकऱ्यांची आत्महत्या झाली, किती शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात आली व किती प्रकरणे मदतीसाठी अपात्र ठरली इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत जानेवारी २०१९ ते डिसेंबर २०१९ या कालावधीत नागपूर जिल्ह्यात २५१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली व तेवढे अर्ज मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले. यातील केवळ १०५ प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली तर तब्बल २९.०८ टक्के म्हणजेच ७३ प्रकरणे अपात्र ठरली. तर तेवढीच प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. पात्र कुटुंबीयांना एकूण १ कोटी ५ लाख रुपयांची मदत देण्यात आली.२०१५ मध्ये सर्वाधिक आत्महत्याप्राप्त झालेल्या माहितीनुसार २०१५ ते २०१९ या ५ वर्षांच्या कालावधीत नागपूर विभागात तब्बल १ हजार ५९२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. यातील ९०१ म्हणजेच ५६.६० टक्के प्रकरणे मदतीसाठी प्राप्त ठरली तर ६१७ प्रकरणांना अपात्र ठरविण्यात आले. तर ७४ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत.सप्टेंबर, जून महिन्यात सर्वाधिक आत्महत्या२०१९ साली झालेल्या शेतकरी आत्महत्यांमध्ये सर्वाधिक ३० आत्महत्या या सप्टेंबर महिन्यात झाल्या. तर त्याखालोखाल जून महिन्यात २८ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. ऑगस्ट व नोव्हेंबर महिन्यात प्रत्येकी २४ शेतकऱ्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याRTI Activistमाहिती अधिकार कार्यकर्ता