पैसे भरणाऱ्यांच्या बँकेत रांगा : शहरातील ५५० पेक्षा जास्त शाखांमध्ये गर्दीनागपूर : केंद्र सरकारने ५०० आणि १००० च्या नोटा चलनातून बंद करण्याच्या निर्णय घेतल्यानंतर गेल्या तीन दिवसांत घरी असलेल्या नोटा बँकेत भरण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली. ग्राहकांनी राष्ट्रीयकृत, खासगी बँका, विदेशी आणि सहकारी बँकांच्या नागपुरातील ५५० पेक्षा जास्त शाखांमध्ये २५०० कोटींपेक्षा जास्त रकमेचा भरणा केल्याची माहिती बँकेच्या अधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना दिली.(प्रतिनिधी)बंद फर्मच्या खात्यात रकमेचा भरणाबँकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, अनेक ग्राहकांनी फर्म बंद असलेल्या खात्यात मोठ्या रकमेचा भरणा केला. जास्त रक्कम भरलेल्या खात्याचीही आयकर विभाग चौकशी करणार आहे. तिन्ही दिवस भरणा भरणारे जास्त आणि रक्कम काढणारे कमी दिसून आले. एटीएममधून दरदिवशी मिळणारे दोन हजार रुपये खर्चासाठी पुरेसे नाहीत. त्यामुळे अनेकांनी प्रारंभी १० हजार रुपये बँकेतून काढले. अशा ग्राहकांना आठवड्यात उर्वरित १० हजार रुपये काढता येणार आहे. बँक आॅफ महाराष्ट्रच्या नागपूर विभागातील शाखांमध्ये तीन दिवसात जवळपास १४० कोटी रक्कम जमा झाली आहे. भरणारे जास्त तर काढणारे कमी ग्राहक दिसून आले. बँकेचे शहरात ३८ एटीएम असून १० एटीएम सुरू केले आहेत. बँकेच्या सीताबर्डी येथील मुख्यालयात तीन एटीएम आहेत. तिथे रोख रक्कम भरता येते, शिवाय पासबुक प्रिंट करता येते. या एटीएममध्ये दिवसातून दोनदा रक्कम भरली. कर्मचारी ग्राहकांना उत्तम सेवा देत असल्याची माहिती बँक आॅफ महाराष्ट्रचे उपमहाव्यवस्थापक विजय कांबळे यांनी सांगितले.
तीन दिवसात २५०० कोटींचे कलेक्शन
By admin | Updated: November 13, 2016 02:40 IST