शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

नागपूर मनोरुग्णालयात नऊ महिन्यात २५ रुग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 00:10 IST

नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयात रुग्णांची प्रकृती बिघडल्यामुळे मृत्यूचे सत्र थांबतच नसल्याची स्थिती आहे. रविवारी ३० सप्टेंबरला रात्री ११ वाजता मनोरुग्णालयाच्या ६० वर्षीय रुग्णाचा मेडिकलमध्ये मृत्यू झाला. या वर्षी ९ महिन्यात २५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागील वर्षी ही संख्या २४ होती.

ठळक मुद्देमागील वर्षीही झाला होता २४ जणांचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयात रुग्णांची प्रकृती बिघडल्यामुळे मृत्यूचे सत्र थांबतच नसल्याची स्थिती आहे. रविवारी ३० सप्टेंबरला रात्री ११ वाजता मनोरुग्णालयाच्या ६० वर्षीय रुग्णाचा मेडिकलमध्ये मृत्यू झाला. या वर्षी ९ महिन्यात २५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागील वर्षी ही संख्या २४ होती.सूत्रानुसार या वर्षी मे महिन्यात २१ दिवसात ६ मनोरुग्णांसह ८ जणांचा मृत्यू झाला होता. यामुळे मनोरुग्णालयाने आवश्यक खबरदारी बाळगली होती. परंतु त्यानंतरही जूनमध्ये १ आणि जुलै-आॅगस्ट या दोन महिन्यात ५ मनोरुग्णांचा मृत्यु झाला. आता सप्टेंबर महिन्यात मनोरुग्णांच्या मृत्यूचा आकडा ४ होऊन एकूण २५ जणांचा मृत्यू झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.१५ डॉक्टर, एक एमडीमिळालेल्या माहितीनुसार, मनोरुग्णालयात १५ डॉक्टर आणि एक एमडी डॉक्टर आहे. मेडिकल हॉस्पिटलमधूनही मनोरुग्णांच्या तपासणीसाठी फिजिशियनला बोलविण्यात येते. एवढ्या मोठ्या प्रमाणात डॉक्टरांची संख्या असूनही रुग्णांची प्रकृती बिघडण्याचे आणि त्यांच्या मृत्यूचे सत्र थांबत नसल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.अज्ञात मनोरुग्णाचा मृत्यूमनोरुग्णालयात ६० वर्षीय मनोरुग्णाला २४ आॅगस्टला दाखल करण्यात आले होते. परंतु १० सप्टेंबरला त्याची प्रकृती बिघडल्यामुळे त्यास मेडिकल हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले होते. मेडिकलमध्ये २० दिवस उपचार घेतल्यानंतर या रुग्णाचा मृत्यू झाला.कर्मचाऱ्यांची लेटलतिफीमनोरुग्णांना उपचारासाठी बाह्यरुग्ण विभागात घेऊन जाणा ऱ्या  नातेवाईकांनाही त्रास होत आहे. बाह्यरुग्ण विभागाची वेळ सकाळी ८ ते दुपारी ३ आहे. परंतु काही कर्मचारी सोडले तर बहुतांश कर्मचारी ९.३० पूर्वी उपस्थित राहत नसल्याची त्यांची तक्रार आहे. तर दुपारी २ वाजताच निघून जात असल्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे.माहिती घेतो : डॉ. पातूरकरप्रादेशिक मनोरुग्णालयाचे नवनियुक्त अधीक्षक डॉ. देवेंद्र पातूरकर यांनी सांगितले की, त्यांना प्रभार घेऊन एक दिवस झाला आहे. असे का होत आहे याची माहिती घेतो असे त्यांनी सांगितले. उपअधीक्षक डॉ. प्रवीण नवघरे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

टॅग्स :mental hospitalमनोरूग्णालयDeathमृत्यू