शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

मेयो इस्पितळाला वीज बचतीसाठी २५ लाखांचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 13:36 IST

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा (मेयो) विजेच्या बिलावर वर्षाला दोन ते अडीच कोटी रुपये खर्च होतो. हे बिल कमी करण्यासाठी व वीज बचतीचे धोरण राबविण्याच्या हेतून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी मेयो प्रशासनाला २५ लाख रुपयांचा धनादेश दिला.

ठळक मुद्देपालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळ यांनी दिला धनादेशसर्वत्र लागणार एलईडी दिवे

आॅनलाईन लोकमतनागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा (मेयो) विजेच्या बिलावर वर्षाला दोन ते अडीच कोटी रुपये खर्च होतो. हे बिल कमी करण्यासाठी व वीज बचतीचे धोरण राबविण्याच्या हेतून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी मेयो प्रशासनाला २५ लाख रुपयांचा धनादेश दिला.मेयोच्या सुवर्ण महोत्सवाच्यानिमित्ताने सोमवारी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री यांनी वीज बचतीच्या धोरणांवर चर्चा केली. ते म्हणाले, मेयोच्या विजेवर वर्षाचे दोन ते अडीच कोटी रुपये खर्च होतात. हा खर्च निम्म्यावर आणण्यासाठी रुग्णालय प्रशासनाकडून प्रयत्न व्हायला हवे. वीज बचत धोरणाची सुरुवात विद्युत दिवे व जुन्या पंख्यांपासून करा. सर्व विद्युत दिव्यांच्या जागी एलईडी दिवे लावा. जुने पंखे काढून त्या जागी ‘फाईव्ह स्टार रेटींग’चे पंखे बसून घ्या. वातानुकूलित व इतरही कुठले उपकरण खरेदीच्यावेळी वीज बचतीची धोरण लक्षात ठेवा अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.‘सोलर’साठी प्रस्ताव तयार करापालकमंत्री बावनकुळे म्हणाले, रुग्णालयाचा मोठा पैसा विजेवर खर्च होत आहे. तो कमी करण्यासाठी ‘सोलर एनर्जी’ बसविण्याचा प्रस्ताव तयार करा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.लाँड्री, किचनचे आऊट सोर्सिंगनवीन‘लाँडी प्लांट’ सुरू करण्यापेक्षा त्याचे आऊट सोर्सिंग करा. तसा प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना देत पालकमंत्री म्हणाले, रुग्णांना जेवण पुरविण्यासाठीही आऊट सोर्सिंग केले जाऊ शकते. यावरही चर्चा करून निर्णय घेण्याचे त्यांनी सुचविले.न्यायवैद्यकशास्त्राच्या इमारतीसाठी ५ कोटी ९० लाखन्यायवैद्यकशास्त्राच्या नव्या इमारतीसाठी ५ कोटी ९० लाख रुपयांचा प्रस्ताव आहे. त्याला मंजुरी मिळण्यासाठी प्रयत्न आहे, अशी माहिती देत पालकमंत्री बावनकुळे म्हणाले, ‘इन्स्टिट्यूट आॅफ चाईल्ड हेल्थ’च्या मंजुरीसाठी, सीएसआर निधीतूून मिळणाऱ्या  १ कोटी ३० लाख रुपयांमधून प्रतीक्षालयासाठी, निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी असलेल्या एक मजलीच्या इमारतीवर सात मजले चढविण्याच्या मंजुरीसाठी प्रयत्न सुरू आहे.३८ नव्या पदांसाठी प्रयत्नपालकमंत्री बावनकुळे म्हणाले, ‘मेडिकल कौन्सिल आॅफ इंडिया’ दरवर्षी मेयोतील अल्प मनुष्यबळाच्या त्रुटीवर बोट ठेवते. यावर उपाय म्हणून लवकरच वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिवांशी बैठक घेऊन नवीन ३८ पदे निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. यात दोन सहयोगी प्राध्यापक, सहा सहायक प्राध्यापक व ३० ट्युटर्सचा समावेश असेल. सोबतच ७० परिचारिकांच्या जागा भरण्यावरही त्यांनी भर दिला.

 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलnagpurनागपूर