शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

६० दिवसांत २४ रुग्ण

By admin | Updated: March 27, 2017 02:22 IST

उन वाढत असतानाही स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून येत आहे. गेल्या ६० दिवसांत पूर्व विदर्भात स्वाईन फ्लूच्या २४ रुग्णांची नोंद झाली आहे.

स्वाईन फ्लूने आणखी एका महिलेचा बळी : टॅमिफ्लू सिरपचा तुटवडानागपूर : उन वाढत असतानाही स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून येत आहे. गेल्या ६० दिवसांत पूर्व विदर्भात स्वाईन फ्लूच्या २४ रुग्णांची नोंद झाली आहे. यातच चार रुग्णांचा मृत्यूने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. सर्वच शासकीय रुग्णालयांमध्ये टॅमिफ्लू गोळ्यांचा साठा असलातरी लहान मुलांना दिले जाणारे ‘टॅमिफ्लू सिरप’चा तुटवडा पडला आहे. याला गंभीरतेने घेत आरोग्य उपसंचालकांनी स्थानिक पातळीवर‘सिरप’ खरेदी करण्याचे निर्देश दिले आहेत.शंकरनगरातील एका खासगी रुग्णालयात चार स्वाईन फ्लूचे रुग्ण भरती होते. त्यापैकी दोन रुग्णांचा मृत्यू झाला, तर दोन रुग्णांवर उपचार करून सुटी देण्यात आली. रामदासपेठ येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका महिलेचा गेल्या आठवड्यात मृत्यू झाला. विशेष म्हणजे, दोन आठवड्यात स्वाईन फ्लूचे चार रुग्णांचे बळी घेतले आहे. स्वाईन फ्लूवर उपसंचालक, आरोग्य विभाग कार्यालय लक्ष ठेवून आहे. नुकत्याच झालेल्या एका बैठकीत स्वाईन फ्लूवरील औषधांचा आढावा घेण्यात आला. त्यानुसार, शहरात आरोग्य विभागाकडे ३० ग्रॅम टॅमिफ्लूच्या १५ हजार गोळ्या, ४५ ग्रॅम टॅमिफ्लूच्या सात हजार गोळ्या तर ७५ ग्रॅम टॅमिफ्लूच्या ८० हजार गोळ्या उपलब्ध आहेत. प्रत्येक जिल्ह्यात स्वाईन फ्लूवरील उपचाराची सोय करून देण्यात आली आहे. आतापर्यंत २४ रुग्णांची नोंद झाली असून सहा रुग्ण खासगी इस्पितळात उपचार घेत आहेत.(प्रतिनिधी)स्थानिक पातळीवर ‘सिरप’ खरेदीउन्हाळ्याच्या तोंडावर स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून येत आहे. यामुळे सर्वच इस्पितळांना सावधगिरीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रुग्णालयांमध्ये टॅमिफ्लू गोळ्यांची स्थिती समाधानकारक आहे. परंतु ‘टॅमिफ्लू सिरप’चा तुटवडा आहे. यावर सर्व रुग्णालयांना स्थानिक पातळीवर हे सिरप खरेदी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.-डॉ. संजय जयस्वालउपसंचालक, आरोग्य विभाग