शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात २४ नव्या रुग्णांची नोंद; कोरोना रुग्ण संख्येने ४०० चा टप्पा ओलांडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 09:09 IST

विदर्भात रविवारी दिवसभरात २४ नव्या कोरोनाबाधितरुग्णांची नोंद झाली. यात अकोल्यात पुन्हा नऊ रुग्ण आढळून आले. शिवाय, अमरावतीत पाच, नागपुरात ९ तर यवतमाळमध्ये एक रुग्णाची नोंद झाली आहे. विदर्भातील कोरोनाबाधितांच्या संख्येने आता ४०० चा टप्पा ओलांडला आहे.

ठळक मुद्देअकोल्यात पुन्हा ९, अमरावतीत ५, नागपुरात ९ तर यवतमाळमध्ये एक रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : विदर्भात कोरोनाबाधित रुग्णांचा वेग मंदावला आहे. रविवारी दिवसभरात २४ नव्या रुग्णांची नोंद झाली. यात अकोल्यात पुन्हा नऊ रुग्ण आढळून आले. शिवाय, अमरावतीत पाच, नागपुरात ९ तर यवतमाळमध्ये एक रुग्णाची नोंद झाली आहे. विदर्भातील कोरोनाबाधितांच्या संख्येने आता ४०० चा टप्पा ओलांडला आहे. रुग्णसंख्या ४०५ झाली आहे.राज्यात कोरोनाचा प्रभाव असलेले कंटेनमेंट झोन वगळता जीवनावश्यक नसलेल्या वस्तूंची सर्व एकल दुकाने सोमवारी सुरू करण्यात आली. यामुळे सामान्यांची रस्त्यावर तुरळक गर्दी दिसून आली असलीतरी कोरोनाविषयक भिती कायम होती. विदर्भात आज पुन्हा नवे रुग्ण आढळून आले. यात नागपुरात नऊ रुग्णांची नोंद झाली. येथील रुग्णांची संख्या १६० वर गेली असून दोन मृत्यू आहेत. बरे झालेल्यांची संख्या ५० आहे. अकोला जिल्ह्यात नऊ रुग्णांची नोंद झाली. रुग्णांची संख्या ६४ वर पोहचली आहे. यातील १३ रुग्ण बरे झाले आहेत. सहा मृत्यू आणि एका कोरोनाबाधित रुग्णाची आत्महत्या आहे. अमरावतीमध्ये आज पाच रुग्णांचे निदान झाले. रुग्णांची संख्या ६६वर गेली आहे. यातील पाच कोरोनामुक्त झाले असून मृत्यूची संख्या १० आहे. विशेष म्हणजे, अमरावती विद्यापीठाच्या प्रयोगशाळेतून आजपासून कोरोना चाचणीला सुरूवात झाली आहे. यामुळे नमुन्यांचा अहवाल तातडीने मिळून रुग्ण उपचाराखाली येणार आहेत. यवतमाळ जिल्ह्यात एक रुग्णाची नोंद झाली. येथील रुग्णसंख्या ९३वर पोहचली असून १२ रुग्ण बरे झाले आहेत. बुलढाणा जिल्ह्यात रुग्णांची संख्या २४वर स्थिरावली आहे. यातील आज एक रुग्ण कोरोनामुक्त झाला आहे. बरे झालेल्यांची संख्या २० आहे. आता केवळ तीन रुग्ण उपचारखाली आहेत. हे तिन्ही कामठी येथील आहेत. भंडारा, वाशिम, गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत प्रत्येकी एकच रुग्ण आढळून आला आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस