शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात पकोडे खाऊ घालून सव्वादोन लाखांचे एलसीडी लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 20:44 IST

पुण्यातील कारचालकाला २५ रुपयांचे पकोडे चारून येथील तिघांनी त्याच्या कारमधील २ लाख २५ हजार रुपयांचे एलसीडी टीव्ही लंपास केले. ५ डिसेंबरला सायंकाळी घडलेल्या या घटनेची तक्रार मिळाल्यानंतर सदर पोलिसांनी सोमवारी या प्रकरणात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देपुण्यातील वितरकाची फसवणूक : सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पुण्यातील कारचालकाला २५ रुपयांचे पकोडे चारून येथील तिघांनी त्याच्या कारमधील २ लाख २५ हजार रुपयांचे एलसीडी टीव्ही लंपास केले. ५ डिसेंबरला सायंकाळी घडलेल्या या घटनेची तक्रार मिळाल्यानंतर सदर पोलिसांनी सोमवारी या प्रकरणात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.घटनेची माहिती अशी आहे की, पुण्यात श्री स्वामी शिवदत्ता एन्टरप्रायजेस आहे. तेथे विनोद नावाच्या व्यक्तीने ५ डिसेंबरला दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत फोन केले. आपल्याला २६ एलसीडी हवेत, असे सांगून नागपुरात पेमेंट करणार असल्याचेही त्याने सांगितले. त्यानुसार, एमएच १४/ सीएस ६१९३ क्रमांकाच्या अर्टिका कारमध्ये २ लाख २५ हजार किमतीचे २६ एलसीडी नागपुरात पाठविण्यात आले. कारचालकाने संबंधित मोबाईल क्रमांकावर फोन करून टीव्ही घेऊन आल्याचे त्याला कळविले. त्यानुसार, तीन जणांनी सदरमधील उत्कर्ष अपार्टमेंट, मंगळवारी बाजारसमोर कार बोलविली. तेथे एलसीडी उतरवून घेतल्यानंतर कारचालकाला आरोपींनी पकोडे खाऊ घातले. त्यानंतर चहा आणून देतो, असे सांगून आरोपी तेथून सटकले. बराच वेळ होऊनही चहा घेऊन आरोपी आले नाही त्यामुळे कारचालकाने नमूद क्रमांकावर संपर्क केला, मात्र आरोपींकडून प्रतिसाद मिळाला नाही. उशिरा रात्रीपर्यंत वाट बघूनही आरोपी आले नाही. त्यामुळे चालकाने पुण्यातील टीव्ही शोरूमच्या मालकाला ही बाब कळविली. त्यांनी दुसऱ्या दिवशी नागपूर गाठून येथे चौकशी केली. वितरकाच्यावतीने पुण्याच्या विजयनगर (दिघी) येथील उमेश शंकर मोरे यांनी सदर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी